आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्विस महिलेवरील गँगरेप : सहा नराधम जेरबंद; लुटीचे साहित्य जप्त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दतिया (मध्य प्रदेश)/बर्न (स्वित्झर्लंड)- दतियानजीक झडिया गावाजवळ शुक्रवारी स्विस महिलेवर झालेल्या सामूहिक अत्याचारप्रकरणी सहा नराधमांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी स्वित्झर्लंड सरकारने केली आहे.

आरोपींनी लुटलेला महिलेचा लॅपटॉप, मोबाइल, रोख 5500 रुपये असा लुटीचा मालही मिळवण्यात आला आहे. एक बंदूकही जप्त करण्यात आली आहे. आरोपी दोन कुटुंबातील आहेत व नात्याने सर्व भाऊ आहेत, अशी माहिती चंबळचे पोलिस महानिरीक्षक डी. के. आर्य यांनी दिली.

दरम्यान, महिला दिल्लीला रवाना झाली आहे. हे दांपत्य सायकलवरून भारतभ्रमणावर निघाले असताना महिलेवर अत्याचार झाला. स्वित्झर्लंडच्या मुंबईतील वाणिज्य वकिलातीतील अधिकारी महिलेच्या संपर्कात आहेत. दरम्यान, पर्यटकांनी नियमांचे उल्लंघन केले. प्रवासाबद्दल त्यांनी स्थानिक पोलिसांना माहिती दिली नव्हती, असे मध्य प्रदेशचे गृहमंत्री उमाशंकर गुप्ता यांनी म्हटले आहे.