आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

130 वर्षांपूर्वी बेगम शाहजहांने तयार केलेला ताजमहाल, पाहा PHOTO

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- 130 वर्षांपूर्वी नवाब शाहजहां बेगमने स्‍वत:साठी एका ताजमहालची निर्मिती केली. एतिहासिक वास्‍तू म्‍हणून प्रसिद्ध असलेल्‍या या ताजमहालची आवस्‍था मात्र दयनीय होत आहे. या ताजमहलाचा ढासळणा-या काही भागाला पुरातत्‍व विभागाने लाखो रूपये खर्च करून पुनर्बांधणी केली आहे. मात्र आजही या ताजमहालचे हाल चालूच आहेत.
काय आहे ताजमहालचा इतिहास-
या महालाची निर्मिती नवाब शाहजहॉं बेगम याने केली होती. 1871 तजमहालच्‍या कामाला सुरूवात झाली. 1884 मध्‍ये या महालाचे काम पूर्ण झाले. 17 एकरमध्‍ये परसलेला हा ताजमहाल यतार करण्‍यासाठी 13 वर्षांचा कार्यकाळ लागला. हे काम पूर्ण करण्‍यासाठी 30 लाख रूपये खर्च त्‍या काळात करण्‍यात आला. ताजमहाल तयार झाल्‍यानंतर भव्‍य कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले. तीन वर्षे सातत्‍याने चालू असलेल्‍या समारोहाला 'जश्न- ए- ताजमहल' नाव देण्‍यात आले.

भोपाळच्‍या ताजमहालचे भविष्‍य-
मध्‍येप्रदेश पयर्टन विकास मंडळातर्फे या ऐतिहासिक ताजमहालाला सुरक्षित करून इंटरनॅशनल हॅरिटेज हॉटेल तयार करण्‍यात येणार आहे. यासाठी 140 कोटी रूपये खर्च करण्‍यात येणार आहेत.
भाेपाळच्‍या ताजमहालचे वैशिष्‍ट्य-
या ताजमहालचे आकर्षक प्रवेशद्वार सर्व पर्यटकांचे मन आकर्षित करते. या वास्‍तूमध्‍ये 120 खोल्‍या आहेत. याबरोबच आठ मोठे हॉल आहेत. या ताजमहालच्‍या आत एक काचेचा महाल आहे. मात्र काळाच्‍या ओघात या महालाचे सौंदर्य लोप पावत आहे.

पुढील स्‍लाईडवर पाहा भोपाळच्‍या ताजमहालची फोटो...