आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकाने विद्यार्थिनीला KISS मागितला, स्टोअर रूममध्‍ये बोलावले, अशी झाली धुलाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - मध्‍यप्रदेशातील होशंगाबाद जिल्‍ह्यातील एका आयटीआयमधील ही घटना आहे. येथे एका शिक्षकाने विद्यार्थिनीचा अश्‍लील छळ केल्‍यानंतर एकच गोंधळ उडाला. विद्यार्थिनीने विरोध केल्‍यानंतर शिक्षकाने चक्‍क तिला एक चपराकही लगावली. त्‍यानंतर संतापलेल्‍या विद्यार्थ्‍यांनी शिक्षकाची पिटाई केली. या प्रकरणी पोलिसांनी संबंधितांवर गुन्‍हे दाखल केले आहेत. पुढे वाचा काय आहे प्रकरण..
मागील दीड वर्षांपासून देत होता त्रास....
-आयटीआयच्‍या चौथ्‍या सत्रातील विद्यार्थिनीला टेक्निकल डिपार्टमेंटचा शिक्षक दीड वर्षांपासून त्रास देत होता.
- नारायण खत्री असे या शिक्षकाचे नाव आहे.
- विद्यार्थिनीने केलेल्‍या तक्रारीनुसार, तो कधी किस मागत होता, तर कधी एकटीला स्‍टोर रुममध्‍ये बोलावत होता.
-मंगळवारी विद्यार्थिनीने तिच्‍या वडिलांकडे या प्रकरणी तक्रार केली.
- विद्यार्थिनीने तिच्‍या वडिलांच्‍या फोनवरून शिक्षकांना फोन केला.
- या शिक्षकाने इकडच्‍या- तिकडच्‍या गोष्‍टी केल्‍या नंतर, केव्‍हा भेटशील असे विचारले.
-बुधवारी विद्यार्थिनी कॉलेजात पोहोचली व तिने शिक्षकावर आरोप केले.
- शिक्षकाने चक्क तिला चपराक लगावली.
- बजरंग दल आणि विश्‍व हिंदू परिषदेला या घटनेची माहिती मिळाली.
- कार्यकर्त्‍यांनी आयटीआयमध्‍ये धाव घेतली अन् एकच गोंधळ सुरू झाला.
- संतापलेल्‍या विद्यार्थ्‍यांनी शिक्षकाची चांगलीच पिटाई केली.
- प्राचार्य एस. के. निगम यांना या बाबत माहिती मिळताच प्रकरण दाबण्‍याचा प्रयत्‍न केला.
- मात्र, विद्यार्थ्‍यांनी पोलिसांना पाचारण केले.
- विद्यार्थ्‍यांनी या शिक्षकाची धुलाई केली तेव्‍हा तो कान पकडून माफी मागत होता.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, या घटनेशी संबंधित फोटो....
बातम्या आणखी आहेत...