आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Terrorist Absconded From The Rapti Sagar Express.

धावत्या रेल्वेमधून दहशतवादी पसार, बॉम्‍बस्‍फोटाची दिली होती धमकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इटारसी - दहशतवादी सय्यद अहमद अली बुधवारी वेल्लूर सशस्त्र सुरक्षा दलाचे कडे तोडून पळ काढण्यात यशस्वी झाला. सय्यदने धावत्या ट्रेनमधून उडी घेतली. लखनऊला चौकशीसाठी त्याला नेण्यात येत होते. त्याने लखनऊ आणि भोपाळ रेल्वेस्टेशनला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली होती. मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

त्रिसूरचा दहशतवादी सय्यद अहमद अली बॉम्बस्फोटाची धमकी दिल्याप्रकरणी वेल्लूर केंद्रीय कारागृहात कैद होता. मंगळवारी लखनऊला त्याला चौकशीसाठी नेण्यात येत होते. त्रिवेंद्रम ते गोरखपूर राप्तीसागर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये आरक्षण नसल्याने सशस्त्र सुरक्षा दल त्याला गार्डच्या बोगीत घेऊन बसले होते. बुधवारी ट्रेन इटारसीहून पुढे भोपाळ आउटरच्या वळणावर धिम्या गतीने जात असतानाची संधी त्याने साधली व उडी मारली. गार्ड बोगीला साखळी नव्हती. जवानांनी हँडल खेचून ट्रेन रोखण्याचा प्रयत्न केला. ट्रेन इटारसीपासून २५ किलोमीटर दूर बुधनी येथे थांबली. येथे जवानांनी एफआयआर नोंदवली. गेल्या वर्षी २८ सप्टेंबर रोजी लखनऊच्या चारबाग रेल्वेस्टेशनला बॉम्बने उडविण्याची धमकी दिल्यामुळे त्याला अटक केले होते. या प्रकारामुळे पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली असून शेजारी राज्यांसह मध्य प्रदेशात सर्वत्र दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
सुरक्षा दलाकडून या झाल्या चार चुका
- आपत्कालीन साखळी नव्हती तर जवान गार्डच्या बोगीत का बसले?
- पोलिसांचे लक्ष हातकडी सोडवण्याकडे कसे गेले नाही?
- दहशतवादी ट्रेनमधून उडी मारू शकतो, जवान का नाही?
- त्याला पकडण्यासाठी सशस्त्र दलाने फायरिंग का केले नाही?