आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उल्कापाताने तयार झाले आहे जगातील सर्वात मोठे सरोवर, Epic trip चे फोटोज...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - फोटोग्राफीसाठी काही यंगस्टर्सने मुंबईपासून स्पीतिपर्यंत 6800 किमीचा प्रवास केला. ही एपिक ट्रिप 40 दिवसात पुर्ण झाली. या काळात त्यांना महाराष्ट्राच्या लोणार क्रेटर लेकपासून शिमला, मनाली, एलोरा यासोबच अनेक ठिकाणाचे रेयर फोटोज आणि व्हिडियो घेतले. जाणुन घ्या हे रेयर फोटोज काढणारे यंगस्टर्स कोण आहेत.

- हे फोटोज काढणारे प्रांशु दुबे, इंदौरला राहतात. यांची फॅमिली आता बुरहानपुरमध्ये आहे.
- आपले दोन मित्र भरत आणि चैतन्यसोबत हे फक्त भारत फिरलेच नाही तर ड्रोनने त्या ठिकाणांचे व्हिडियो बनवले.
- या प्रवासा त्यांना जवळपास 1 लाख 2 रुपये खर्च आला.
असा होता ट्रिपचा रुट
- मुंबईमधून 20 जूनला प्रवासाला सुरुवात केली आमइ 30 जुलैला ट्रिप पुर्ण झाली.
- मुंबई- लोणार- एलोरा - बुरहानपुर - असीरगढ - सातपुडा - जबलपुर - वाराणसी - लखनऊ - नैनीताल - ऋषिकेश - देहरादून - मसूरी - शिमला - स्पीति वॅली - मनाली - तिजारा - इंदौर - मुंबई.

स्पीति वॅलीमध्ये पाहिले हे गाव
- नाको, ताबो, धनकर, सगनम, मुद, हिक्कीम कौमिक , काज़ा , की , किब्बर , रंगरिक , लालुंग , लांगजा , डेमूल , ताशीगंग , गेते.
किती झाला खर्च
- डिजेल 35 हजार रुपये
- होटेल्स अँड होम स्टेमध्ये 30 हजार रुपये
- टोलमध्ये 4 हजार
- खाणे आणि इतर खर्चात 33 हजार रुपये
महाराष्ट्रातील अनेक पर्यटण स्थळांपैकी सर्वात वेगळे आणि दुर्मिळ असे 'लोणार सरोवर' हे जागतिक पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. या सरोवराचे वैशिष्ट्य म्हणजे हे सरोवर अवकाशातून पृथ्वीवर पडलेल्या उल्कापातामुळे बनलेले पहिले सरोवर आहे. त्यामुळे यातील पाणी खारट आहे. या खारट पाण्यामुळे येथे शेकडो वर्षांपूर्वी समुद्र होता असा अंदाज लावण्यात येतो. संशोधकांच्यामते हे सरोवर बनताना आकाशातून दहा लाख टन वजनाची एक मोठ्ठी उल्का येथे पडली असवी.
जवळपास 1.8 किलोमिटर व्यासाचे हे सरोवर जवळपास पाचशे मीटर खोल आहे. अजूनही अनेक संशोधक या सरोवरावर संशोधन करत आहेत, की ही उल्का सरळ पृथ्वीवर पडली की, एखादा ग्रह पृथ्वीला धडकला.
तीन भागांमध्ये तुटली उल्का
पृथ्वीला धडकल्यानंतर या उल्केचे तीन तुकडे झाले होते. यापैकीच एक लोणार सरोवर आहे, तर इतर दोन सरोवर आता सुकले आहेत.

2006 मध्ये झाली विचित्र घटना
2006 मध्ये लोणार सरोवरात एक विचित्रच घटना घडली. या सरोवराचे पाणी अचानक बाष्पीभवन होऊन संपून गेले. तेव्हा गावकर्‍यांना या सरोवरात पाण्याच्या ठिकाणी मीठ आणि इतर खनिजांचे चमकणारे तुकडे मिळाले.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा त्यांनी काढलेले काही खास फोटोज आणि व्हिडियो...