आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बंद झालेल्या नोटा देऊन खरेदी केली वधू, मधुचंद्राच्या आधी तरुणीने असा दिला चकमा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मधुचंद्रासाठीचे साहित्य खरेदी करण्याच्या बहाण्याने महिलेने घरातून पळ काढला. - Divya Marathi
मधुचंद्रासाठीचे साहित्य खरेदी करण्याच्या बहाण्याने महिलेने घरातून पळ काढला.
छतरपूर/भोपाळ - लग्न करावे, संसार करावा हे प्रत्येकाचे स्वप्न असते. असेच स्वप्न उराशी बाळगून असलेल्या छन्नूलाल शुक्लाला मात्र लग्नाच्या नावाखाली १ लाख ६० हजारांचा गंडा घालण्यात आला आहे. मधुचंद्राच्या आधीच त्याची पत्नी पळून गेली आणि त्याला पोलिस स्टेशन गाठावे लागले आहे.

काय आहे प्रकरण
- छतरपूर जिल्ह्यातील सिंग्रामपूरा गावातील छन्नुलाल शुक्ला दिव्यांग असल्यामुळे मुली त्याला पंसत करत नव्हत्या.
- लग्नासाठी मुलगी मिळत नाही, हे पाहून छन्नूलालने दलालाच्या माध्यमातून १ लाख ६० हजारांमध्ये नवरी विकत घेतली.
- एका मुलीसोबत कोर्ट मॅरेज करुन २५ नोव्हेंबरला तिला घरी घेऊन आला. छन्नुलालचे स्वप्न सत्यात येत होते.
मधुचंद्राचे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारात गेली आणि...
- नववधू मधुचंद्राची तयारी करायचे सांगून बाजारात निघाली. तेव्हा छन्नुलालही तिच्यासोबत गेला.
- बाजारात काही साहित्य खरेदी केल्यानंतर छन्नुलालच्या पत्नीने टॉयलेटला जाण्याच्या बाहाण्याने पळ काढला.
- मात्र अपंग छन्नुलालने ती ज्या कारमध्ये बसून निघाली होती तिच्यासमोर उडी घेतली आणि कार आडवली.
- त्यानंतर गाडीतून तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र छन्नुलाल आणि काही लोकांनी तिला पकडले आणि थेट पोलिस स्टेशनला घेऊन गेले.
- मधुचंद्राचे स्वप्न पाहात असलेला छन्नुलाल नववधूला घेऊन पोलिस स्टेशनमध्ये गेला आणि लग्नाच्या नावाखाली ठगवण्यात आल्याची तक्रार दिली.
महिलेचा छन्नुलालकडे राहाण्यास नकार
- बिजावर पोलिस स्टेशन या प्रकरणात महिला सशक्तीकरण विभाग आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सल्ला घेत आहे.
- पोलिसांनी तरुणीची महिला संरक्षण केंद्रात रवानगी केली आहे.
- ती इंदूरची रहिवासी असल्याचे सांगत असून तिने छन्नुलालसोबत राहाण्यास नकार दिला आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, महिला आणि दलालाकडून ठगवला गेलेला छन्नुलाल...
बातम्या आणखी आहेत...