आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेलिकॅप्टरने व-हाड घेऊन नवरदेव पोहोचला वधूच्या घरी, 20 किमीसाठी मोजले 3 लाख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वराने हेलिकॅप्टराने नेले व-हाड - Divya Marathi
वराने हेलिकॅप्टराने नेले व-हाड
श्‍यामपूर/भोपाळ - घरातील ज्येष्‍ठ मंडळींची इच्छा पूर्तर्तेसाठी एका नवरदेवाने चक्क 20 किलोमीटर व-हाड घेऊन जाण्‍यासाठी 3 लाख रुपये खर्च केली. वधूला आणण्‍यासाठी तो हेलिकॉप्टरने व-हाड घेऊन गेला. प्रकरण काय आहे...

- बुधवार संध्‍याकाळ : अजमत नगरमध्‍ये बनवला गेला हेलिपॅड. येथून महुआखेरासाठी हेलिकॅप्टर व-हाडासह निघाले तेव्हा त्यांना पाहण्‍यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली होती.
- वर पित्याचे म्हणणे होते, की हे सर्व आम्ही घरातील ज्येष्‍ठांची इच्छा पूर्ण करण्‍यासाठी केले.
- या भागातील लोक गेल्या वीस दिवसांपासून अहमदपूर भागात व-हाड हेलिकॅप्टरने जाणार हा चर्चेचा विषय बनला होता.
- शेवटी बुधवारी संध्‍याकाळी वर आपली वधूला आणण्‍यासाठी हेलिकॅप्टरने रवाना झाला.
- अहमदपूर भागातील अजमत नगरहून महुआखेरासाठी बुधवारी संध्‍याकाळी हेलिकॅप्टर रवाना झाले.
- दोन्ही ठिकाणी महिला, मुले आणि पुरुष गावातील घरांच्या छतांवर उभे राहून हेलिकॅप्टर येण्‍याची वाट पाहात होते.
- वराच्या गावात बनलेल्या हेलिपॅडवर संध्‍याकाळी चार वाजण्‍याच्या सुमारास हेलिकॅप्टर उतरले.
20 दिवसांपासून विवाहाची चर्चा होती.
- 7 एप्रिल रोजी अहमदपूर येथील सूरजसिंह गुर्जर यांनी आपल्या मुलाचे व-हाड महुआखेराचे रहिवाशी महेंद्रसिंह गुर्जर यांच्या येथे हेलिकॅप्टर नेण्‍यासाठी परवानगी मागितली होती. एडीएम केदार सिंह यांना याबाबत विनंती पत्र दिले होते.
- 27 एप्रिलच्या संध्‍याकाळी व-हाड रवाना झाले आणि 28 एप्रिल रोजी सकाळी परतले.
पुढे वाचा, पंधरा मिनिटांमध्‍ये पोहोचला वर, सोमवारी वीज कनेक्शन