आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॉक्‍स घालून चालत होते मध्‍यप्रदेशचे CM; बुट घेऊन मागे चालत होता सुरक्षारक्षक, व्‍हायरल झाला व्हिडिओ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदोर/उज्‍जैन- मध्‍यप्रदेशचे मुख्‍यमंत्री शिवराज सिंह चौहान पुन्‍हा एकदा वादात सापडले आहे. त्‍यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्‍हायरल झाला आहे. यामध्‍ये शिवराज सिंह फक्‍त सॉक्‍स घालून चालताना दिसत आहे. त्‍यांचे बुट सुरक्षारक्षकाच्‍या हातात आहेत. बुट घेऊन तो मुख्‍यमंत्र्यांच्‍या मागे चालत आहे. हा व्हिडिओ उज्‍जैन येथील आहे. एका जैन संताच्‍या कार्यक्रमानंतर शिवराज सिंह भाजपाच्‍या अभ्‍यास शिबिराला जाताना ही घटना घडली.
काय आहे घटना 
 
- बुधवारी उज्‍जैन येथील तपोभूमिमध्‍ये भाजपाच्‍या अभ्‍यास शिबिराचा वर्ग होता. 
- शिवराजसिंह  यांनी या शिबिरात भाग घेतला होता. 
- तपोभूमि जैन संतांचे स्‍थान आहे. सध्‍या तेथे प्रज्ञासागर महाराज थांबलेले आहेत. 
- अभ्‍यासशिबिराला जाण्‍याअगोदर शिवराज सिंह प्रज्ञासागर यांच्‍याकडे गेले. प्रज्ञासागर यांच्‍याजवळ जाण्‍यासाठी त्‍यांनी आपले बूट बाहेर काढून ठेवले. 
- प्रज्ञासागर यांचे दर्शन आणि आशिर्वाद घेतल्‍यानंतर बुटे न घालताच शिवराज सिंह अभ्‍यास शिबिरासाठी जाण्‍यास निघाले. 
- शिवराज सिंह निघताच त्‍यांच्‍या सुरक्षारक्षकांनी त्‍यांचे बुट उचलले व तो त्‍यांच्‍या मागे चालू लागला. 
- अभ्‍यासशिबिरापर्यंत पोहोचेपर्यंत शिवराजसिंह सॉक्‍सनेच चालत राहिले व सुरक्षारक्षक त्‍यांचे बुट घेऊन चालत मागे चालत राहिला. 
 
यापूर्वीही सुरक्षारक्षकांनी शिवराजसिंह यांना कडयावर घेतले होते
- काहि महिन्‍यापूर्वीही सुरक्षारक्षकांनी शिवराजसिंह यांना अक्षरक्ष: कडयावर उचलले होते. 
- त्‍यावेळी शिवराज सिंह पन्‍ना जिल्‍ह्यामध्‍ये पुरस्थितीचा आढावा घेण्‍यासाठी गेले होते. तेव्‍हा पाण्‍यामूळे बूट ओले होऊ नये म्‍हणून सुरक्षारक्षकांनी शिवराजसिंह यांना कडयावर घेत जलमय रस्‍ता पार केला होता. 
- ते फोटोही सोशल मिडियावर व्‍हायरल झाले आहेत. 
 
पुढील स्‍लाईडवर पहा, घटनेचे फोटोज आणि व्हिडिओ
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)   
 
 
बातम्या आणखी आहेत...