आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॉक्स घालून चालत होते MP चे CM, सुरक्षा रक्षकाने हातात घेतले जोडे, VIDEO व्हायरल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर/उज्जैन- सोशल मीडियात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मुख्यमंत्री सॉक्स घालून पायी चालत असून, सुरक्षारक्षकाने त्यांचे जोडे हाताता घेतल्याचे व्हिडिओत दिसत आहे. व्हिडिओ उज्जैन येथील आहे. शिवराज सिंह जैन सत्संग कार्यक्रमानंतर भाजपच्या मेळाव्यात पोहोचले होते.

काय आहे हे प्रकरण...?
- उज्जैनमधील तपोभूमीत बुधवारी भाजपचा मेळावा झाला.  
- शिवराज सिंह या कार्यक्रमाला उपस्थित झाले होते. तपोभूमि जैन संतांचे श्रद्धास्थळ आहे. संत प्रज्ञासागर महाराज येथेच थांबले आहेत. 
- भाजपच्या मेळाव्या उपस्थिती देण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी प्रज्ञासागर महाराज यांची भेट घेतली. प्रज्ञासागर यांच्या कक्षात जाण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी जोडे काढले. 
- प्रज्ञासागर यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर मुख्यमंत्री सॉक्सवरच मेळाव्यात चालत आले.  
- मुख्यमंत्र्यांच्या एका सुरक्षारक्षकाने त्यांचे जोडे हातात उचलले होते.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी शिवराज सिंह यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
- मुख्यमंत्री पन्ना जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहाणी करण्यासाठी पोहोचले होते. तेव्हा एका सुरक्षारक्षकाने शिवराज यांना उचलून घेत रस्ता ओलांडला होता.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, सोशल मीडियात व्हायरल झालेला व्हिडिओ आणि फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...