आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला माहिती आहे का.. या बौद्ध स्तुपांजवळ, हे आहे भारतातील सर्वात प्राचीन मंदिर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांची हे स्तुपांसाठी प्रसिद्ध आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण या पर्यटन स्थळाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याठिकाणी भारतातील सर्वात प्राचीन मंदिर आहे. याबाबत फारच कमी लोकांना माहिती आहे. आर्किटेक्चर एव्हीडेंसेसनुसार हे भारतातील सर्वात जुने मंदिर आहे. आर्कियॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने याला 'टेम्पल नंबर 17' असे नाव दिले आहे. चौथ्या शतकामध्ये गुप्त कार्यकाळात हे मंदिर तयार करण्यात आले होते.

2400 वर्षे जुन्या ग्रीक मंदिरांसारखे डिजाइन..
1600 वर्षे जुने मंदिर 'टेम्पल नंबर 17'
मंदिरात एक छोटी खोली आणि मंडप तयार करण्यात आला आहे. त्याचे डिझाइन प्रारंभिक ग्रीक काळातील मंदिरांसारखे आहे. विशेषतः अॅथेन्समध्ये इसवीसन पूर्व 420 मध्ये तयार करण्यात आलेल्या 'टेम्पल ऑफ विंगलेस व्हीक्टरी' सारके याचे डिझाइन आहे. मंदिराचे छत सपाट आणि मंडपापेक्षा थोडे उंच आहे. प्रारंभिक काळातील हिंदु मंदिरांची रचना अशीच असायची. 6 खांबांच्या आधारावर हे मंदिर तयार करण्यात आले आहे. खांबांचा खालचा भाग चौकोनी आहे. मधल्या भागाला 8 आणि 16 बाजु आहेत. त्याच्या वरच्या बागावर सिंहांच्या प्रतिकृती आहेत.

कोणी शोधले मंदिर..
1818 मद्ये ब्रिटीश अधिकारी जनरल टेलर यांनी सांचीचा शोध लावला. त्याचवेळी हे मंदिर आणि आजुबाजुला असलेल्या वास्तूही मिळाल्या.

केव्हा बनवले...
हे मंदिर सम्राट गुप्त काळातील आहे. हे उदयगिरी गुहांच्या समकालीन असल्याचेही सांगितले जाते. सांचीपासून 13 किमी लांब असलेल्या या गुहा इसवीसन 380 ते 415 या काळात चंद्रगुप्त विक्रमादित्य द्वितीय यांच्या कार्यकाळात बनवल्या होत्या.
स्टोरी इनपूट : नारायण व्यास (रिटायर्ड आर्कियॉलॉजिस्ट, ASI), A Guide to Sanchi (written by- सर जॉन मार्शल)

पुढील स्लाइडवर जाणून घ्या, कोणाची मूर्ती होती मंदिरात..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...