आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपेक्षेवरुन उज्जैन कुंभमेळ्यात रंगला साध्वीच्या जिवंत समाधीचा \'प्रयोग\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उज्जैन- महिला आखाड्याची उपेक्षा केली जात असल्याची तक्रार करत परी आखाड्याच्या प्रमुख त्रिकाल भवंता यांनी मंगळवारी दुपारी १ वाजता समाधी घेण्याचा प्रयत्न केला. समाधीसाठी खोदण्यात आलेल्या मोठ्या खड्ड्यात त्या उतरल्या व ध्यानमुद्रा धारण करत त्यांनी समर्थकांना आदेश दिले की मला, समाधी द्या. कार्यकर्त्यांनी लगेचच त्यांच्या सभाेवती माती टाकणे सुरू केले. याची माहिती मिळताच पोलिसांची तुकडी परी आखाड्यात पोहोचली. घटनास्थळी तणाव होता. पोलिस अधिकारी सतीश द्विवेदी यांनी साध्वीं बाहेर काढण्याचे प्रयत्न केले.
पुढील स्लाइडवर वाचा, मुख्यमंत्र्यांना बोलवा, तरच बाहेर येते