आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्यांना आरक्षण मिळतेय त्यांनी स्वत:च ठरवावे की कुठपर्यंत याचा फायदा घ्यायचाय: RSS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - आरक्षणावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी शनिवारी एका पत्रकार परिषदेत म्हटले की, जे ऑफिसर आरक्षणाचा लाभ घेत आहेत, त्यांनी स्वत:च ठरवावे की, कधीपर्यंत याचा फायदा घ्यावा. डॉ. आंबेडकरांनी एक सामाजिक समस्या समोर आणून आरक्षणाची तरतूद केली होती. जोपर्यंत समाजाला याची गरज आहे, तोपर्यंत याचा फायदा घेतला जावा. आरक्षणामुळे अधिकाऱ्यांत मतभेद असता कामा नये. भैयाजींनी हे वक्तव्य भोपाळमध्ये झालेल्या आरएसएसच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांसमोर केले.
 
आरक्षणप्रकरणी शिवराज चौहान सरकार सुप्रीम कोर्टात...
- प्रमोशनमध्ये आरक्षणप्रकरणी एमपी सरकार सुप्रीम कोर्टात गेले आहे. या प्रश्नावर ते म्हणाले की, याविषयी संघात कोणतीही चर्चा झाली नाही.
- शेतकरी आत्महत्यांबाबत जोशी म्हणाले की, शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे योग्य दाम मिळत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यांच्या पिकाचे योग्य भाव ठरवण्यासाठी आणि ते खरेदी करण्यासाठी योग्य सिस्टिमची गरज आहे.
- ते म्हणाले की, कर्ज माफी हे काही सोल्यूशन नाही. शेतकऱ्यांना ते स्वत: कर्ज फेडू शकतील एवढे सक्षम बनवले पाहिजे.
 
पुढच्या स्लाइड्सर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...