आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंदिरातून घरी जाणाऱ्या आठवीच्या मुलीला कारमध्ये ओढले, तिघांनी केला रेप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर (मध्य प्रदेश)- आठव्या वर्गात शिकणारी मुलगी मंदिरातून घरी जात होती. यावेळी टाटा सफारीमध्ये आलेल्या तिघांनी तिला बळजबरी कारमध्ये ओढले. धावत्या कारमध्येच आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर रस्त्याच्या कडेला सोडून फरार झाले. या घटनेने मुलगी एवढी घाबरली होती की एक आठवडा ही घटना कुणाला सांगितली नाही. पण अखेर तिने कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी कारमधील तिघांना अटक केली आहे.
अशी घडली घटना
- भिंडमधील मिहोना परिसरातील आठवीत शिकणारी मुलगी 14 नोव्हेंबर रोजी पूजा करण्यासाठी मंदिरात गेली होती. त्यानंतर घरी येताना एक टाटा सफारी तिच्याजवळ थांबली.
- कारजवळ थांबल्याने तरुणी जरा बावरली. पण काही कळायच्या आत कारमधील तिघांनी तिला अचलून कारमध्ये कोंबले. दार लावून घेतले.
- भरधाव वेगात एका अज्ञात स्थळी कार आणली. कारचा वेग कमी करत तिघांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला.
- ज्या मंदिराजवळून तिचे अपहरण केले होते त्याजवळ असलेल्या एका रस्त्यावर सोडून दिले. त्यानंतर तिघे फरार झाले.
- या घटनेने मुलगी प्रचंड घाबरली होती. घरच्यांना सांगावे की नाही या द्विधा मनस्थितीत ती होती.
- सुमारे आठवडा झाल्यानंतर तिने कुटुंबीयांना झालेली घटना सांगितले. त्यानंतर या घटनेची पोलिस तक्रार देण्यात आली.
वडील होते परगावी
- काही कामानिमित्त मुलीचे वडील बाहेरगावी गेले होते. ते परत आल्यानंतर या घटनेची पोलिस तक्रार देण्यात आली.
- पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. एक आरोपी अद्याप फरार आहे.
- रेपसाठी वापरण्यात आलेली टाटा सफारीही पोलिसांनी जप्त केली आहे.
पुढील स्लाईडवर बघा... याच कारमध्ये केला रेप... हे आहेत आरोपी..... बघा फोटो....
बातम्या आणखी आहेत...