आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्यप्रदेशात कर्जबाजारपणामुळे 3 शेतकर्‍यांची आत्महत्या; मुख्यमंत्री उद्या मंदसौरला जाणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- मध्यप्रदेशात शेतकरी आंदोलन पेटले असताना कर्जबाजारपणामुळे शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागील 24 तासांत राज्यातील 3 शेतकर्‍यांनी आत्महत्या केली आहे. रेहटीमधील जाजना गावातील आणि होशंगाबाद जिल्ह्यातील सिवनी मालवा येथील दोन शेतकर्‍यांचा यात समावेश आहे.

दुसरीकडे, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान उद्या (बुधवार) मंदसौर आणि पिपलिया मंडी येथे भेट देणार आहे. शेतकरी आंदोलनात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 7 जणांचा मृत्यू झाला होता. मृत शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांची मुख्यमंत्री भेट घेऊन त्यांचे सांत्वन करणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री पिपलिया मंडी येथील व्यापार्‍यांची भेट घेणार आहेत. येथे शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागले होते.

दरम्यान, राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान खुद्द उपोषणाला बसले होते. शेतकर्‍यांच्या आग्रहास्तव त्यांनी रविवारी तब्बल 24 तासांनंतर उपोषण सोडले. माजी मुख्यमंत्री कैलाश जोशी यांनी नारळाचे पाणी पाजून त्यांचे उपोषण सोडवले. मुख्यमंत्री शनिवारी भोपाळच्या दसरा मैदानावर उपोषणाला बसले होते.

“मी शेतकऱ्यांना कुठल्याही समस्या येऊ देणार नाही. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींपैकी अनेक शिफारशी सरकारने आधीच लागू केल्या आहेत. काही असामाजिक तत्त्वांनी राज्यातील वातावरण खराब करून हिंसाचार पसरवला आहे. त्यांना सोडणार नाही. या प्रकारात काँग्रेसशी संबंधित काही लोकही सहभागी आहेत. हिंसाचारादरम्यान ज्या लोकांच्या संपत्तीचे नुकसान झाले आहे, त्यांना राज्य सरकार मदत करेल.”, असे उपोषण सोडण्यापूर्वी शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले होते.
राज्यात 3 ठिकाणी 3 शेतकर्‍यांच्या आत्महत्या... वाचा पुढील स्लाइडवर...
बातम्या आणखी आहेत...