आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Three Friends Burnt Alive In Case Of Honor Killing Balaghat Madhya Pradesh

ऑनर किलिंग: वडिलांनी विटेने ठेचला तरुणीचा चेहरा तर तीन तरुणांना गाडीत जिवंत जाळले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बालाघाट/मुजफ्फरनगर- मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशात ऑनर किलिंगच्या दोन धक्कादायक घटना घडल्या आहेत. उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये 19 वर्षीय तरुणीची तिचे वडील आणि भावाने निर्घृण हत्या केली आहे. तरुणीचा चेहरा विटेने ठेचण्यात आला आहे. शेजारच्या गावातील एका तरुणासोबत तिला त्यांना पाहिले होते. दुसरी घटना मध्यप्रदेशातील बालाघाटमधील कुरई येथे घडली आहे. तीन तरुणांना गाडीत ज‍िवंत जाळण्यात आले आहे.

बालाघाटमधील वनग्राम धोबी टोलाजवळी घनदाट जंगलात गुरुवारी रात्री तीन तरुणांना गाडीत कोंडून ज‍िवंत जाळण्यात आले. तिन्ही तरुण एका तरुणीला पळवून नेण्याच्या प्रयत्नात होते. तरुणीच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती मिळाली आणि त्यांनी तिन्ही तरुणांना त्यांच्या गाडीत जिवंत जाळले. बोरीखेडा येथील राजेश मानुनागोत्रा, रामजी टोला येथील दीपक आणि सिवनी कुरई येथील निहाल राजेन्द्र सिंघारे अशी मृत तरुणांची नावे आहेत.
दीपक हा इंदूर येथे शिक्षण घेत असून तो काही दिवसांसाठी त्याच्या गावी आला होता. दीपकचे धोबी टोला येथील रहिवासी एका तरुणीसोब प्रेमप्रसंग होते. दीपक त्याचा मित्र राजेशसोबत तरुणीला भेटण्यासाठी गेला होता. राजेश याने काही दिवसांपूर्वी बोलेरो गाडी सिवनी येथून खरेदी केली होती.
दीपकसह राजेश आणि न‍िहाल हे तिघे गुरुवारी रात्री बोलेरो गाडीतून धोबी टोला बाहेरील नाल्याजवळ उभे होते. तितक्यात तरुणीच्या नातेवाईकांनी तिघांना गाडीत कोंडून नंतर गाडीला पेटवून दिले. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीच्या नातेवाईकांना तिन्ही तरुण गावात आल्याची माहिती आधीच मिळाली होती. नातेवाईकांनी आधी बोलेरो गाडीची तोडफोड केली. नंतर तिन्ही तरुणांना गाडीत कोंडून गाडीला त्यांनी पेटवून दिले. निहालने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला गाडीतून बाहेर निघून पळायला लागले. परंतु काही अंतरावर त्याचा मृत्यु झाला. दीपक आणि राजेश यांचे मृतदेह गाडीत विचित्र अवस्थेत जळाल्याचे आढळले.

खरगोनमध्या रजिस्टर्ड आहे गाडी
तिन्ही तरुणांना जिवंत जाळण्यात आलेली बोलेरो गाडी खरगोन जिल्ह्यातील चैनपूर (झिरन्या) येथील पत्यावर रजिस्टर्ड आहे. एमपी-10-सीए- 9999 अशा गाडीचा क्रमांक आहे. राजेश याने ती सेकंडहॅंड खरेदी केली असावी, पोलिसांनी कयास लावला आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, मुजफ्फरनगरमध्ये वडील आणि भावाने विटेने ठेचला तरुणीचा चेहरा...