आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 तरुण मुलींच्या मृतदेहांना कवटाळून रडत राहिली आई, रात्रभर सुरू होता आक्रोश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलींची आई रात्रभर आक्रोश करत होती. - Divya Marathi
मुलींची आई रात्रभर आक्रोश करत होती.
भोपाल/रायसेना - शहरापासून 35 किमी दूर असलेले हकीमखेडी गाव. येथील दगड खाणीच्या खड्ड्यात अंघोळ करणाऱ्या चार तरुणींचा एकमेकाला वाचवताना बुडून करुण अंत झाला. एक तरुणी पोहून बाहेर आली, पण दोन सख्ख्या बहिणी आणि एका मामाच्या मुलीचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना दोन सख्ख्या बहिणींच्या आईसमोरच झाला. मुलींचे मृतदेह बाहेर काढल्यानंतर आई त्यांना बिलगून कित्येक तास रडत होती. रात्रभर ती मुलींच्या मृतादेहाशेजारी बसून रडत होती.
- या अपघाताच्या वेळी त्या ठिकाणी हजर असलेल्या आईने बुडत असलेल्या आपल्या एका मुलीला बाहेर काढले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. पोटात पाणी जमा झाल्याने तिथेच ती गतप्राण झाली. घटनास्थळी पोहोचलेल्या तरुणांनी दोन तरुणींचे मृतदेह खदानीतून बाहेर काढले. दगडांच्या या खदानी अनेक वर्षांपासून बंद आहेत, पण पाणी साचलेल्या खदानीच्या चारही बाजूंनी तार फेन्सिंग केलेली नाही. खनिज आणि वन विभागाच्या बेपर्वाईमुळे ही घटना झाली.
 
अशी झाली दुर्दैवी घटना 
- हकीमखेडीचे राहणारे मनसुखदास वैष्णव यांची पत्नी गीताबाई आपल्या मोठी वंदना, लहान मुलगी संजना, भावाची मुलगी मोहनबाई आणि मोनिकासह गुरुवारी दुपारी शेतात गेली होती.
- शेतातून परत येताना गीता खदानीच्या कडेला कपडे धूत होती, तर तिच्या मुली खदानीच्या पाण्यात अंघोळीसाठी गेल्या.
- यादरम्यान वंदना पाणीमध्ये बुडायला लागली. तिची छोटी बहीण संजना आणि मोहनबाईने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण एकमेकाला वाचवताना तिघीही पाण्यात बुडाल्या.
- बुडणाऱ्यांपैकी मोना कशीबशी पाण्याबाहेर आली आणि तिने फोन करून आई, भावाला या घटनेची माहिती दिली. यानंतर गावकरी खदानीच्या ठिकाणी पोहोचले आणि पाण्यात बुडालेल्या दोन मुलींचा शोध त्यांनी सुरू केला.
- एकदाच तीन तरुण मुलींचा असा बुडून मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
बातम्या आणखी आहेत...