आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Throw Child After Birth In Bhopal Madhya Pradesh

जन्मदात्या मातेनेच कचरा कुंडीत फेकले नवजात शिशु; मुंग्यांनी घेतला सर्वांगाला चावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- एका जन्मदात्या मातेनेच पोटच्या मुलीला कचरा कुंडीत फेकल्याची घटना उघडकीस आली आहे. दक्षिण टीटी नगरात रविवारी सायंकाळी ही धक्कादायक घटना घडली. कडाक्याच्या थंडीत तब्बल तासभर ही नवजात बालिका कचरा कुंडीत जिवाच्या आकांताने हंबरडा फोडत होती. कचरा कुंडीतील मुंग्यांनीही तिच्यावर हल्ला चढवत तिच्या सर्वांगाला चावा घेतला होता. वेदनेने ही बालिका सारखी रडत होती. या घटनेमुळे 'माता न तू वैरणी' अशी म्हणण्याची वेळ आली आहे. सध्या या बालिकेवर रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे.

दीपशिखा शाळेजवळ राहणारे राजीव पटेल यांनी सांगितले की, रविवार सायंकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांनी तान्ह्या मुलाचा रडण्याचा आवाज ऐकला. त्यांना वाटले की शेजारच्या घरात एखादे मुल रडत असेल. मात्र, एक तास झाला तरी मुल रडण्‍याचा आवाज थांबत नसल्याचे पाहून राजीव पटेल घराबाहेर निघाले. त्यांनी शेजारी विचारपूस केली. मात्र, शाळेच्या मागून आवाज येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी शाळेमागे जाऊन पाहिले तर कचर्‍यात एक नवजात शिशु जीवाचा आकांताने हमसून हमसून रडत होते. शिशुच्या चेहर्‍यावर मुंग्या होत्या. हे दृष्य पाहाताच राजीव पटेल यांना धक्काच बसला त्यांनी 108 अॅम्बुलन्सला फोन केला. काही क्षणात अॅम्बुलन्स घटनास्थळी पोहोचली. ईएमटी अभिषेक श्रीवास्तव यांनी नवजात शिशुला उचलून त्याच्या अंगावरील मुंग्या झटकल्या. हे शिशु दोन ते तीन तासांपूर्वीच जन्मलेले असल्याचे श्रीवास्तव यांनी सांगितले. कडाक्याच्या थंडीत शिशुचे अंग थंडगार पडले होते. त्याला तातडीने वॉर्मर देण्यात आले. नंतर ऑक्सिजन देत त्याला कमला नेहरू रुग्णालयात दाखल करण्‍यात आले.

कमला नेहरू रुग्णालयातील बालिकेवर उपचार सुरु आहेत. बालिकेला जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले आहे. शिशुची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे.


पुढील स्लाइड्‍वर क्लिक करून पाहा, जन्मदात्या मातेनेच कचरा कुंडीत फेकून दिलेल्या नवजात बालिकेचे छायाचित्रे...