आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाघोबाने पाडला गाईचा फडशा, नंतर ऐटीत फिरला जंगलात, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाजापूर/इंदूर - शाजापूरपासून सुमारे 35 किलोमिटर अंतरावर असलेल्‍या बागलीमध्‍ये तीन दिवसांआधी एका गाईची शिकार केल्‍यानंतर वाघ कॅमे-यात कैद झाला. या फोटोंमध्‍ये गाईला खाताना वाघ दिसत आहे. कॅमे-यात कैद झालेला वाघ पाहिल्‍यानंतर वन विभागाची झोप उडाली. त्‍यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी पाच कॅमेरे लावण्‍यात आले.
जंगलात वाघ शिरल्‍याचे असे आले लक्षात....
- 3 जानेवारीला रात्री बागलीजवळ असलेल्‍या जंगलात गाईची शिकार झालेली दिसली.
- गाईच्‍या मानेवर जोरदार हल्‍ला केल्‍याचे दिसत होते.
- या प्रकरणानंतर गाईवर हिंसक प्राण्‍याने हल्‍ला केल्‍याचे वन विभागाने सांगितले होते.
- मात्र तपासानंतर परिसरात वाघाच्‍या पायाचे ठसे आणि विष्‍ठा आढळली.
- वन विभागाने मृत गाईच्‍या परिसरात काही कॅमेरे लावले.
- शिकार झाल्‍यानंतर तिस-या दिवशी वाघ तेथे आला.
- मंगळवारी रात्री 8.30 वाजताची चित्रं कॅमे-यात कैद झाली.
- जंगलात वाघ शिरल्‍याची खात्री झाल्‍यानंतर वन विभागाने परिसरातील नागरिकांना खबरदारी घेण्‍याची सूचना दिली.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, शिकार खाताना कॅमे-यात कैद झालेला वाघ...