आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुरुंगात कैद अब्जावधींची मालकिण माजी IAS अधिकारी, मुलीचे लग्न पाहाण्याची इच्छा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जबलपूर - उत्पन्नापेक्षा अधिक संपत्तीच्या प्रकरणात बडतर्फ करण्यात आलेली आयएएस टीनू जोशी सध्या तुरुंगात आहे. तिच्या मुलीचे आज (6 ऑगस्ट) लग्न असून इंटरनेटच्या माध्यमातूनही ती मुलीच्या लग्नात सहभागी होऊ शकणार नाही. टीनू जोशी आणि तिचा पती अरविंद यांच्याकडे 2010 मध्ये जवळपास 300 कोटींची संपत्ती सापडली होती. या प्रकरणात टीनू तुरुंगात आहे. तिने गेल्या आठवड्यात हंगामी जमीनासाठी याचिका दाखल केली होती.
टीनू जोशीने दाखल केलेल्या जामीन अर्जात नमूद केले होते, की मुलीचे 6 ऑगस्ट रोजी वॉशिंग्टनमध्ये लग्न आहे. तिला स्काइपच्या माध्यमातून इंटरनेटने लग्नात सहभागी व्हायचे आहे आणि मुलीला आशीर्वाद देण्याची इच्छा आहे. 3 ऑगस्ट रोजी लोकायुक्तांनी या प्रकरणाचा तपास करुन उत्तर देण्यास सांगितले होते.
गुरुवारी लोकायुक्तांचे अधिवक्ता पंकज दुबेंनी कोर्टाला सांगितले, की लोकायुक्त डीएसपींनी टीनूचे सासरे हरिवल्लभ जोशी आणि त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली . त्यांनी लग्नाची पत्रिका इंटरनेटवर अपलोड करण्यात आल्याचे सांगून पुढे काही सांगण्यास नकार दिला. लग्न आहे किंवा नाही याची खातरजमा झालेली नाही. दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधिश शांतनु केमकर यांनी निकाल राखीव ठेवला.
काय आहे प्रकरण
आयकर विभागाने 4 फेब्रुवारी 2010 मध्ये जोशी दाम्पत्याच्या घरी छापा टाकला होता. त्यात उत्पन्नापेक्षा जास्त 3 कोटी 4 लाख रुपये रोख सापडले होते. त्याशिवाय उत्पन्नापेक्षा जास्त 300 कोटी रुपयांची संपत्ती सापडली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी राज्य सरकारने 1979 च्या बॅचचे आयएएस अधिकारी अरविंद जोशी आणि टीनू जोशी यांना निलंबित केले होते. आयकर विभागाला जोशी दाम्पत्याच्या घरी रोख रकमेशिवाय 2,391 यूएस डॉलर, 1790 पाउंड आणि 1050 यूरो विदेशी चलन सापडले होते. त्याची किंमत साधारण 8 लाख रुपये होती. याशिवाय त्यांच्याकडे स्थावर - जंगम मालमत्ता सापडली होती.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, संबंधीत फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...