आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘तीसरी कसम’चे ‘छोटे नंगे ’ ५८ वर्षांचे, सागरमध्ये गावात चित्रीकरणाला ५० वर्षे पूर्ण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सागर - मध्य प्रदेशातील सागरजवळ चित्रीकरण झालेल्या तीसरी कसमला शनिवारी ५० वर्षे पूर्ण झाली. चित्रपटात माला गावातील चार-पाच वर्षाच्या मुलाने छोटेखानी भूमिका केली होती. त्यात तो राज कपूर व वहिदा रेहमान यांच्या मागे विवस्त्र धावताना दिसून आला होता. शूट पूर्ण होताच संपूर्ण युनिट त्याला लाडाने ‘छोटे नंगे ’, असे म्हणू लागले. आता ते मूल ५८ वर्षांचे झाले आहे.
गावात तेव्हापासून त्यांची आेळख छोटे नंगे अशीच झाली आहे. त्यावर या आजोबांनादेखील काहीही आक्षेप नाही. उलट आनंद वाटतो. चित्रपटासाठी संशोधनाचे काम करणारे अनिल वर्मा म्हणाले, चित्रपटात गाडीवान हिरामण (राज कपूर), नौटंकीवाली बाई हिराबाई (वहिदा रेहमान) यांना घेऊन बैलगाडीने जात होते. गाणे चित्रित केले जात होते- ‘लालीलाली डोलिया में..’ त्याच वेळी शेजारच्या माला गावातील काही मुले धावत येत होती. गाणे संपले तोच मातीचा मोठा धुरळा उडाला. त्यात चार-पाच वर्षांचे विवस्त्र मूल समोर आले. तेच छोटे नंगे आहेत. त्या वेळी चित्रीकरणाचे गावकऱ्यांना अप्रूप होते.
राज कपूर-विठ्ठलभाई पटेलांची भेट
तीसरी कसम चित्रपटाची निर्मिती गीतकार शैलेंद्र यांनी केली होती. गीतकार शैलेंद्र, मुकेश, शंकर जयकिशन यांच्याशी विठ्ठलभाई पटेल यांची १९५७-५८ पासून मैत्री होती. शैलेंद्र यांच्या आग्रहामुळेच शोमन राज कपूर छोट्याशा खिमलासापर्यंत आले होते. पटेल यांनी राज कपूर व वहिदा रेहमान यांच्यासाठी गाड्यांची व्यवस्थादेखील केली होती. पटेल व राज कपूर यांच्यातील मैत्री पुढे आणखी वाढत गेली. त्यामुळे राज कपूर अनेक वेळा सागरला येऊन गेले.
छायाचित्र: पाच दशकांपूर्वी चित्रपटात चमकलेले हेच ते आजोबा.
बातम्या आणखी आहेत...