आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या सभेसाठी बुरखा, टोपीत येण्याचे ‘निमंत्रण’; भोपाळमध्ये कार्यकर्ता महाकुंभ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - भाजपतर्फे 25 सप्टेंबर रोजी कार्यकर्ता महाकुंभ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी मुस्लिम कार्यकर्त्यांना त्यांच्या पारंपरिक वेशभूषेत यावे, अशी विशेष सूचना करण्यात आली आहे. म्हणजे मुस्लिम कार्यकर्त्यांनी टोपी घालून, तर महिलांनी बुरख्यात यावे, असे निमंत्रण देण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची वेगळी बैठक व्यवस्थादेखील करण्यात आली आहे.

या मेळाव्याची जबाबदारी अल्पसंख्याक मोर्चावर टाकण्यात आली आहे. मेळाव्याच्या माध्यमातून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची धर्मनिरपेक्ष प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी भाजपच्या प्रदेश शाखेने अल्पसंख्याक मोर्चाला रॅलीच्या तयारीचे निर्देश देण्यात आले आहेत. 25 सप्टेंबरला जंबुरी मैदानावर होणार्‍या या सभेसाठी एकूण पाच लाखांवर नागरिक सहभागी होतील, असा अंदाज आहे.