आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्य प्रदेशात 6 जागी आज फेरमतदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - मध्य प्रदेशातील सहा मतदान केंद्रांवर सोमवारी फेरमतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान अनेक तक्रारी आल्यामुळे निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला. गेल्या सोमवारी राज्यात विधानसभेसाठी मतदान पार पडले, परंतु पाच मतदारसंघांतील सहा मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेत गोंधळ झाला होता. त्याबद्दलच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे सोमवार सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यंत फेरमतदान होणार आहे.
182 चौराई, 189 लाहार, 14-बाहरार, 151- बैकुंठपूर, 145- बारौदा, 100-उज्जैन इत्यादी मतदान केंद्रांवर फेरमतदान होणार आहे. लाहारमधील मतदार केंद्रावरील ईव्हीएम यंत्राची तोडफोड झाली होती. पानागार व सिरमौर येथे मतदान अधिका-यांच्या चुकीमुळे मतदानाची नोंदच होऊ शकली नाही. त्यांनी चुकीचे बटण दाबल्यामुळे ही विचित्र घटना घडली.