आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MP : कोरड्याठण्‍ण नदीला 5 मिनिटांत महापूर, वाहून गेल्‍या गाड्या, पाहा...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जबलपूर/भोपाळ - मध्‍यप्रदेशात पावसाचा जोर वाढला आहे. मंगळवारी भोपाळ, इंदूर, उज्जैनसह राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला. दरम्‍यान, डिंडौरी जिल्‍ह्यातील कोरड्याठण्‍ण बुढनेर नदीत धरणाचे पाणी सोडल्‍याने अवघ्‍या 5 मिनिटांत तिला महापूर आला. यात नदी पात्रांतून वाळू उपसा करणाऱ्या अनेक गाड्या वाहून गेल्‍या. सुदैवाने या घटनेत जिवीत हानी झाली नाही.
नेमके काय झाले...
> डिंडौरीपासून 10 किमी अंतरावर असलेल्‍या मोहगाव येथे बुढनेर नदीत मंगळवारी दुपारी 2 वाजताच्‍या सुमारास धरणाचे पाणी सोडण्‍यात आले. यामुळे जवळपास अर्धा डजन वाहने नदीत अडकली आहेत.
> अवघ्‍या पाच मिनिटांत कोरड्या नदीत 20 फूट पाणी भरले. सायंकाळी पूर ओसला. परंतु, गाड्या अजूनही नदीतच फसलेल्‍या आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...