आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Traditional Marriage Of Old Couple In Madhya Pradesh

95 चा नवरदेव, 93 ची नवरी, लग्नाचा 75 वा वाढदिवस असा केला साजरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- बैतूल येथील रहिवासी निवृत्त प्राचार्य महेश पचौरी यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. लग्नाला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शानदार लग्नाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे या लग्नातील नवरदेव 95 चा तर नवरी 93 वर्षांची होती.
लग्नाच्या 75 व्या वाढदिवाचे निमित्त साधत महेश पचौरी यांनी पत्नी मीराबाई यांच्यासह पुन्हा पारंपरिक पद्धतीने लग्न केले. लग्नाआधी नवरदेवाची घोड्यावरुन वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. दोघांना मुली, मुले, नातवंडे असे मोठे कुटुंब आहे. लग्नाला संपूर्ण कुटुंब उपस्थित होते.
पुढील स्लाईडवर बघा, या पारंपरिक पद्धतीने झालेल्या या लग्नाची छायाचित्रे...