आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM SPL: मुलांसाठी ट्रॅफिक पार्कसंबंधी नर्सरीपासून दररोज एक तास देतात वाहतुकीचे धडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खांडवा (मध्य प्रदेश)- या ट्रॅफिक पार्कमध्ये मुलांना नर्सरीपासूनच वाहतुकीच्या नियमाचे धडे शिकवले जाणार आहेत. यासाठी दररोज एक तास घेण्यात येईल.
  
मध्य प्रदेशातील खांडव्यातील सोफिया कॉन्व्हेंट स्कूलमध्ये अशा प्रकारचा पार्क तयार करण्यात आला आहे. या ट्रॅफिक पार्कमध्ये झेब्रा क्रॉसिंग, वाहतुकीचे सिग्नल व संकेतकाच्या पाट्या लावण्यात आल्या आहेत. शनिवारी संस्थेच्या १६ व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने या ट्रॅफिक पार्कचे उद््घाटन करण्यात आले. निमाडमध्ये हा एक नवा प्रयोग असल्याचा दावा संस्थेने केला आहे. वाहतूक नियमांचे पाठ शिकल्यानंतर मुलेसुद्धा आपल्या पालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्यास प्रेरित करतील. यामुळे निश्चितपणे अपघातात घट होईल.  

प्राप्त माहितीनुसार, नॅशनल रेकॉर्ड क्राइम ब्युरो (एनसीआरबी)च्या आकडेवारीनुसार, २०१४ मध्ये मध्य प्रदेशात ९२९२ व्यक्ती अपघातात दगावल्या आहेत. त्यामुळे शाळांमधून  सुरू करण्यात आलेल्या ट्रॅफिक पार्कमध्ये नर्सरीपासून मुलांना वाहतूक नियमाचे पालन करणे शिकवले जाईल. वाहतुकीचे नियम शिकल्यानंतर ते घरी जाऊन पालकांनाही जागृत करतील असे वाटते.  

अशी सुचली कल्पना  
फादर फिलिप यांनी सांगितले, सुमारे दोन वर्षांपूर्वी तत्कालीन पोलिस अधीक्षकांनी वाहतूक नियमाचे पालन करण्यासंदर्भात पोलिस खूप काही प्रयत्न करतात. पण इतर संस्थांनीही या कामात पुढाकार घेतला पाहिजे. तेव्हाच ट्रॅफिक पार्क तयार करण्याची कल्पना आम्हाला सुचली.
बातम्या आणखी आहेत...