आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेचे मुलाच्या मित्राशी अवैध लैंगिक संबंध, मग झाला अल्पवयीनांचा ट्रिपल मर्डर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तीन खून करणारी पूनम दुबे. पुनमचे आपल्या मुलाच्या मित्राशी - हेमंतशी अवैध संबंध होते. यातून हेमंतचा खून झाला. तो इतर दोघांनी पाहिल्याने त्यांना तिने संपवले. - Divya Marathi
तीन खून करणारी पूनम दुबे. पुनमचे आपल्या मुलाच्या मित्राशी - हेमंतशी अवैध संबंध होते. यातून हेमंतचा खून झाला. तो इतर दोघांनी पाहिल्याने त्यांना तिने संपवले.
भोपाळ - ट्रिपल मर्डर केसमध्ये मुख्य आरोपी पूनम ऊर्फ पक्का हिला शिक्षा देण्यासाठी पोलिसांनी कोर्टात 200 पानी दोन चार्जशीट दाखल केल्या आहेत. यात पुरावा म्हणून 40 साक्षीदार, 12 मोबाइलचे 600 पेक्षा कॉल डिटेल्स, जप्त केलेली गाडी, रक्ताने माखलेले कपडे सामील आहेत. पोलिसांचा दावा आहे की, या पुराव्यांच्या आधारे आरोपीला जरूर शिक्षा होईल.
 
असे आहे प्रकरण...
- 18 मे 2017 रोजी सिंचन विभागाचे ऑफिस अधीक्षक अंतरसिंह मीना यांचा मुलगा हेमंतचे अपहरण झाले होते. परंतु, त्याचे मित्र लोकेश, ऋत्विक यांचे मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांना कळले की हेमंतचीही हत्या झालेली आहे. यात अधिक चौकशी केल्यावर पूनम दुबे आणि 2 इतर अल्पवयीन आरोपी असल्याचे आढळले. खुनाचे कारण हेमंतची पैशांची मागणी होते. खुनाचे दुसरे कारण म्हणजे, हेमंत आणि पूनमचे अवैध शारीरिक संबंधही होते, जे पूनमच्या मुलाला पसंत नव्हते. नंतर हेमंतचे आरोपींनी अपहरण केले, अन् त्याचा खून केला. लोकेश आणि ऋत्विक यांनी जेव्हा हे सर्व पाहिले, तेव्हा त्यांनाही संपवण्यात आले.
 
पोलिसांनी असा लावला छडा
शहराच्या सर्वात चर्चित तिहेरी खून प्रकरणात केंट पोलिसांनी 90 दिवसांआधीच चार्जशीट दाखल केली. याप्रकरणी मुख्य आरोपी पक्का ऊफ पूनमला शिक्षा होण्यासाठी 70 दिवसांत पोलिसांनी अनेक पुरावे गोळा केले. गुरुवारी केंटचे टीआय आशिष सप्रे कोर्टात पोहोचले. त्यांनी जेएमएफसी केके मिश्रा यांच्या कोर्टात दोन वेगवेगळ्या 180 ते 200 पानी लोकेश आणि ऋत्विक हत्याकांड प्रकरणाची चार्जशीट दाखल केली. यात आतापर्यंत गोळ्या केलेल्या सर्व पुराव्यांचा उल्लेख आहे. याच आधारे पोलिस आरोपीला शिक्षा होण्याचा दावा करत आहेत. आता पोलिस कोर्टात आपले पुरावे आणि साक्षीदार हजर करणार आहे.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...