आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Truck Bike Major Accident, Two Child Died On Spot National Latest News And Updates

ट्रकने दिली भीषण धडक, आईच्या कडेवरून पडली 2 मुले, तडफडत झाला भररस्त्यात मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपघातानंतर असे दृश्य होते. जखमी आई, मृत मुले, बाजूला उभा असलेला मामा. - Divya Marathi
अपघातानंतर असे दृश्य होते. जखमी आई, मृत मुले, बाजूला उभा असलेला मामा.
छतरपूर (भोपाळ) - नॅशनल हायवेवर जवाहर नवोदय शाळेच्या जवळ बुधवारी दुपारी 3 वाजता भरधाव ट्रकने बाइकला मागून जोरदार धडक मारली. दुसरीकडे अपघातात मुलांची आई आणि बाइक चालवणारा मामा जखमी झाले.
 
बहीण आणि भाच्यांना घेऊन जात होता मामा...
- गंगायच गावाचा रहिवासी शंकर अहिरवार सिमरा गावात गेला होता. सिमरा गावात त्याची मोठी बहीण रामप्यारीचे सासर आहे.
- शंकर हा बुधवारी त्याची बहीण रामप्यारीसह भाचा आयुष आणि पीयुषला बाइकवर घेऊन गावाकडे जात होता.
- यादरम्यान नौगाव परिसरात जवाहर नवोदयच्या मागून येणाऱ्या एका ट्रकने बाइकला टक्कर मारली.
- धडक एवढी भीषण होती की दूरपर्यंत मोटारसायकलसहित चिमुकली मुले फरपटत गेली. अपघातात आयुष आणि पीयूष दोघेही जागीच गतप्राण झाले.
- पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन भाऊ शंकर अहिरवार आणि बहीण रामप्यारी यांना बेशुद्धावस्थेत 108 रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात दाखल केले.
- पोलिसांनी ट्रक आणि अपघातग्रस्त बाइक जप्त केली आहे.
- ट्रकचालकाला अटक करून पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलिस म्हणाले.

चिमुकल्यांच्या अंगावरून निघून गेला ट्रक...
- ट्रक ड्रायव्हरने बेपर्वाईने वाहन चालवत मागून जोरदार धडक मारली. या भीषण अपघातात बाइकस्वार 4 जण खाली पडले.
- फरपटत दोन्ही मुले ट्रकच्या चाकाखाली आली. ट्रकची चाके एका मुलाच्या डोक्यावरून आणि दुसऱ्या मुलाच्या कमरेखालील भागाला चिरडून गेली.
- यामुळे दोन्ही बालकांचा जागीच करुण अंत झाला. मुलांची आई आणि मामा थोड्या अंतरावर पडल्याने ते वाचले, परंतु गंभीर जखमी झाल्याने बेशुद्धावस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
 
आक्रोश करत महिलेने परत घटनास्थळी जाण्याचा केला हट्ट...
- बेशुद्धावस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेली आई रामप्यारी अहिरवारला 4 वाजता शुद्ध आली.
- शुद्धीत येताच तिने आक्रोश करत आपल्या मुलांबाबत हॉस्पिटलच्या स्टाफकडे चौकशी सुरू केली.
- यानंतर तिने एका नातेवाइकालाही मुले ठीक आहेत का, अशी विचारणा केली. परंतु कुणालाच तिला सत्य सांगण्याचे धाडस झाले नाही.
- यामुळे तिने 108 वाहन बोलावून मुलांना स्वत: पाहण्यासाठी परत नौगावला पाठवण्याचा हट्ट केला.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या हृदयद्रावक घटनेचे आणखी PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...