आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रक ड्रायव्हर साडेचार तास मृत्यूच्या दाढेत, ओरडत होता- मला मरायचे नाही !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ट्रकमध्ये अडकलेला ड्रायव्हर - Divya Marathi
ट्रकमध्ये अडकलेला ड्रायव्हर
इटारसी (मध्यप्रदेश) - येथे मंगळवारी एक ट्रक उलटला त्यानंतर जवळपास साडेचार तास जीवन आणि मृत्यूच्या दरम्यान अडकलेल्या ट्रक ड्रायव्हरला सोडवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु होते. मदतीची याचना करणारा ट्रक ड्रायव्हर जीवाच्या अकांताने ओरडत होता. मला वाचवा, मला मरायचे नाही, थोडं पाणी तरी प्यायला द्या... ओरडून-ओरडून तो बेशुद्ध पडत होता. शुद्धीवर आल्यावर पुन्हा मदतीसाठी टाहो फोडत होता.

ड्रायव्हरला वाचवण्यासाठी ज्याला जे जमेल तो ते करत होता. तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर सायंकाळी 4 वाजून 7 मिनीटांनी त्याला सुरक्षीत बाहेर काढण्यात यश आले. जीवन-मरणाच्या लढाईत त्याने मृत्यूवर मात केली होती. बाहेर काढण्यात आल्यानंतर तो एकही शब्द बोलू शकला नाही. त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

काय घडले होते
एमपी 04 एचई - 2675 क्रमांकाचा ट्रक राजस्थानातील कोटा येथे चालला होता. साधारण 11.35 वाजता इटारसीच्या बागदेव पुलाच्या जवळ ट्रक जंगलात उलटला. क्लिनर यशवंत गुर्जर आणि आणखी एक जण ट्रकमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. मात्र ट्रक ड्रायव्हर रामस्वरुप गुर्जर (30) उलटलेल्या ट्रकमध्येच अडकला. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दुपारी दीड वाजता ड्रायव्हरला वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले.
सुरुवातीला गॅस कटरने ट्रकला कापण्याचा प्रयत्न झाला. ट्रकच्या डिझेल टँकमधून झालेल्या गळतीमुळे ट्रक पेट घेण्याची भीती व्यक्त झाली. नगर पालिकेचे फायर ब्रिगेड बोलावण्यात आले. मात्र आगीच्या भीतीने कटरचे काम बंद करण्यात आले. जेसीबीने ट्रक सरळ करण्याची कल्पना पुढे आली. मात्र जेसीबी येण्यासाठी तीन तास लागतील असे सांगण्यात आले. बचाव पथकासमोर ट्रक ड्रायव्हरला जिवंत बाहेर काढण्याचे आव्हान होते, आणि त्यांचा तो उद्देश अखेर सफल झाला.