आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO: सिलेंडर भरलेला ट्रक कोसळला घरावर, दोन चिमुकल्यांचा गेला जीव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(घरावर कोसळलेल्या ट्रकचा फोटो )

ग्वाल्हेर - गुप्तेश्वरच्या डोंगरांमधील तिघरा रोडच्या बाजूलाच राहणार्‍या एका घरातील सतीश उर्फ बल्लू बाथम यांच्या घरावर एलपीजी सिलेंडरने भरलेला ट्रक पडल्याने त्यांच्या दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी रात्री जवळपास 12.15 मिनिटाने घडली. घटनास्थळी पोलिस जवळपास तीन वाजेला आली. त्यानंतर क्रेन मागवण्यात आली आणि घरामध्ये दबल्या गेलेल्या दोन्ही मुलांना काढण्याचे काम सुरू करण्यात आले. |
तिघडा रोडाच्या बाजूलास असलेल्या उताराच्या ठिकाणी सतीश बाथम आपल्या कुटुंबासमवेत राहतात. रात्री ट्रक घरावर कोसळल्यानंतर पोलिसांनी घरात दबलेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. जवळपास अर्धातास कठोर मेहनत घेतल्यानंतर जवळपास साडे तीन वाजता सतीश यांचा मोठा मुलगा अर्जून (वय 14) याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तर त्यांचा छोटा मुलगा करण (वय 11) याला जेव्हा बाहेर काढले तेव्हा त्याचा श्वास चालू होता. त्याला ताबडतोब जवळील एका रुग्णालयात नेण्यात आले मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषीत केले.
क्रेन वेळेवर आली असती तर वाचला असता जीव
जर क्रेन वेळेवर आली असती तर माझ्या मुलांना जीवंतच बाहेर काढता आले असते. राडारोडा काढण्यास जास्त वेळ लागल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे, असे सतिश बाथम यांनी सांगितले.
ट्रक चालकाला पकडण्यास लागला वेळ
पोलिस प्रशासनाकडे क्रेन नाही आहे. क्रेन संचालकांकडे क्रेन तर मिळाली मात्र क्रेनचा ड्रायव्हर शोधण्यास वेळ लागला, अशी माहिती जनकगंजचे टीआय, निर्मल जैन यांनी दिली.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, घरावर पडलेल्या ट्रकचे फोटो...