आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'तेरा होने लगा हूँ' गाण्यावर एकमेकांच्या गळ्यात वरमाला, बॉलिवूड थीमवर झाले हे लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर - एकता कपूरच्या टीव्ही सीरियल्स सारखा सेट, शाही मंडप आणि लग्नाची पूर्ण तयारी एखाद्या बॉलिवूड फिल्मच्या लग्नासारखी. पाहाणाऱ्यांना असेच वाटत होते की एखाद्या फिल्म किंवा सीरिलयची शुटिंग सुरु आहे. मात्र हा सेटही खरा होता आणि लग्नही. हे लग्न होते टीव्ही अॅक्ट्रेस अंकिता चौधरी आमि तिचा बालपणीचा मित्र सौरभ उधानी यांचे.

- ग्वाल्हेरच्या हॉटेल रीजेंन्सी स्केअर गार्डनमध्ये झालेल्या या लग्नासाठी सौरभ राजेशाही बग्गीमध्ये बसून आला होता.
- वरातीत सौरभने मित्रांसोबत डान्स केला, मग प्रवेशद्वारावर अंकिताच्या आईने त्याचे औक्षण केले.
- काही वेळाने अंकिताने बॉलिवूड स्टाइल एन्ट्री केली. अंकिताचा हात हातात धरून सौरभ तिला स्टेजवर घेऊन गेला.
- त्यानंतरची थिम होती गाण्याची... तेरा होने लगा हूँ... हे गाणे वाजले आणि सौरभ - अंकिताने एकमेकांच्या गळ्यात वरमाला टाकली.
एकाच शाळेत झाले सौरभ-अंकिताचे शिक्षण
- जोधा-अकबर सीरियलमध्ये काम करत असलेली ग्वाल्हेरची अंकिता आणि सौरभ यांचे शालेय शिक्षण आणि कोचिंग क्लासही एकच होता.
- अंकिता ग्लॅमर जगतात नाव कमावत आहे तर सौरभही मुंबईत एका बँकेत मॅनेजर आहे.
कुटुंबीयांनी ठरविले लग्न
- बालपणीच्या मैत्रीचे आयुष्याच्या जोडीदारात रुपांतर करण्याचा निर्णय या दोघांच्या कुटुंबीयांनी घेतल्याचे ते सांगतात. लग्न जसे बॉलिवूड स्टाइल झाले तसे लग्नाआधीचे सोहळेही झाले.
- संगीत सोहळा ग्वाल्हेरच्या एका हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता.
- शुक्रवारी रात्री बॉलिवूड थीमवर अंकिता आणि सौरभचे लग्न झाले. लग्नानंतरही अंकिता पहिल्यासारखीच सीरिलयल्समध्ये काम करताना दिसणार आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, बॉलिवूड स्टाइल लग्नाचे काही निवडक फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...