भोपाळ (मध्य प्रदेश)- करोंद येथील अमन कॉलनीत मुस्लिमांच्या दोन समुदायांमध्ये काल जोरदार हिंसा झाली. एका समुदायाच्या सुमारे 500 लोकांनी दुसऱ्या समुदायाच्या घरांना घेरले आणि लाठा-काठ्या, तलवारी घेऊन जिवघेणा हल्ला केला. यावेळी तब्बल 39 घरांना आग लावण्यात आली. यातील सहा घरे तर संपूर्ण बेचिराख झाली. 28 दुचाक्या आणि एका कारलाही आग लावून नष्ट करण्यात आले. 30 गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महिलांना मारहाण, दागिने लुटले
मुस्लिमांच्या एका समुदायातील लोकांनी महिलांना मारहाण केली. त्यांचे डोके फोडले. त्यांच्याकडे असलेले दागिने आणि पैसे लुटून नेले. यामुळे अनेक कुटुंबांनी घरे सोडून पळ काढला.
सगळेच झाले बेचिराख
हिंसाचार बराच आधी सुरु झाला होता. पण स्थानिक प्रशासनाला फार उशीरा जाग आली. त्यानंतर उपद्रवी लोकांना हुसकावून लावण्यात आले. या परिसरात हॅलोजन लाईट्स लावण्यात आले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात येत आहे.
रिकाम्या जागेवर इमामवाडा बनवायचे होते इराणींना
सुमारे दहा महिन्यांपूर्वी अमन कॉलनीतील शिया समुदायाचे काही नागरिक घरे बांधत होते. या परिसरात आफताब मशिद आहे. याच्या बाजूला असलेल्या रिकाम्या जागेवर या समुदायाने पाय पसरले होते. याचा सुन्नी समुदायाने जोरदार विरोध केला होता. त्यावरुन संघर्ष निर्माण झाल्याचे समजते.
पुढील स्लाईडवर बघा, जिवाचा थरकाप उडवणाऱ्या खुनी संघर्षाचे फोटो...