आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Persons Open Fire On Police Person And Others In Gwalior

ग्वाल्हेरमध्ये थरार, दोन माथेफिरुंनी केला बेछूट गोळीबार, पोलिस अधिकाऱ्याला ठार मारले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- शब्दप्रताप आश्रम पोलिस ठाण्यात माथेफिरुंनी पोलिस अधिकारी आर. के गौतम यांना गोळ्या मारल्या.)
ग्वाल्हेर (मध्य प्रदेश)- या शहरात काल दोन माथेफिरुंनी तब्बल तासभर पोलिसांना वेढीस धरले. त्यांनी प्रताप आश्रम पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकाऱ्यांसोबत भांडण करीत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यांची पिस्तूल लुटून नेली. त्यानंतर किराणा आणि मेडिकल स्टोअरच्या मालकाला गोळ्या मारुन जबर जखमी केले. माथेफिरुंनी एक 11 गोळ्या झाडल्या. रात्री 9.20 च्या सुमारास घडलेल्या या थरारक प्रकाराने मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या स्मृती ताज्या झाल्या.
दोघांनी बहोडापूर परिसरातील विनयनगर चौकातून गोळीबार करण्यात सुरवात केली. गुर्जर रुग्णालयाजवळ असलेल्या किराण्याच्या दुकानात दोघे गेले. त्यांनी सिगारेट मागितली. त्यानंतर दुकानदाराने पैसे मागितल्यावर मालक अनूप गोयक यांनाच्यावर गोळीबार केला. गोळी अनुप यांच्या छातीत लागली. यावेळी गर्जर रुग्णालयाचे कंम्पाऊंडर एस. एस. चौहान उभे होते. त्यांनी मधे पडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावरही दोघांनी गोळीबार केला. त्यांच्या हाताला गोळी लागली.
त्यानंतर दोघे माथेफिरु शब्दप्रताप आश्रम पोलिस ठाण्यात गेले. त्यांनी पोलिस अधिकारी आर. के. गौतम यांच्याशी भांडण केले. त्यांच्यावर गोळीबार केला. यावेळी गौतम यांनी पळण्याचा प्रयत्न केला. पण माथेफिरु गोळीबार करीत राहिले. यात गौतम यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांची पिस्तूल घेऊन माथेफिरु पळाले.
त्यानंतर माथेफिरु पडाव पोलिस ठाण्याच्या हद्दितील विकासनगरात गेले. येथील हिंमाशु मेडिकल स्टोअरमध्ये रॉबिन आणि हिमांशु गुप्ता यांना कफ आणि इतर औषधी मागितल्या. यावर रॉबिन म्हणाला, की लवकर औषधे सांगा. दुकान बंद करायचे आहे. त्यानंतर दोघांनी पिस्तूल काढून गोळीबार केला. रॉबिनच्या कानाला आणि पोटात गोळी गेली. लगेच दोघांनी पळ काढला. दोघांना शोधण्यासाठी पोलिसांनी व्यापक शोध मोहिम राबवली. पण दोघे हल्लेखोर पळण्यात यशस्वी झाले.
पुढील स्लाईडवर बघा, दोन माथेफिरुंनी कोणावर केला गोळीबार... जिवाचा थरकाप उडवणारी छायाचित्रे...