आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 हजारांत विकले \'राम-रहीम अन् हनीप्रीत\', दोघांना आणले होते असे सजवून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कार्तिक यात्रेत आलेल्या गाढवांची नावे राम रहीम आणि हनीप्रीत अशी ठेवण्यात आली होती. - Divya Marathi
कार्तिक यात्रेत आलेल्या गाढवांची नावे राम रहीम आणि हनीप्रीत अशी ठेवण्यात आली होती.
इंदूर - उज्जैनमध्ये राम रहीम आणि हनीप्रीतला पाहून लोक हैराण झाले. हे दोघे येथे सुरू असलेल्या कार्तिक यात्रेत आले होते. आणि खूप सजूनधजून फिरत होते, यात्रेत येणाऱ्या प्रत्येकाची नजर यांच्यावरच होती. वास्तविक कार्तिक पशू यात्रेत आलेल्या हरिओम यांनी आपल्या गाढवाचे नाव राम रहीम आणि गाढविणीचे नाव हनीप्रीत ठेवले होते, उज्जैनच्या एका खरेदीदाराने यांना 11 हजारांत खरेदी केले.
 
अशी भरते यात्रा...
- उज्जैनमध्ये दरवर्षी देवप्रबोधिनी एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत गाढवांची यात्रा भरते. एमपीच्या शिवाय गुजरात, हरियाणा, राजस्थान आणि महाराष्ट्रासहित अनेक राज्यांतील पशुपालक कुंभार आणि व्यापारी या यात्रेत गाढवांची खरेदी-विक्री करण्यासाठी येतात. प्रजातीच्या आधारावर येथे गाढवांची 5 ते 25 हजारांत विक्री होते.
- या यात्रेची खासियत म्हणजे येथे गाढव विकायला येणारे व्यापारी जवळपास प्रत्येक गाढवाचे नाव ठेवतात. गाढवाचे नाव त्याच्या पाठीवर लिहिले जाते. नाव पाहून विचारल्यावर व्यापारी गाढवाची माहिती आणि त्याची किंमत सांगतो, आणि मग खरेदीदार त्याचे तपासणी करून, भाव करून त्याला खरेदी करतो.
 
नाव ठेवल्याचा पश्चात्ताप
- या वेळी यात्रेत राम रहीम आणि हनीप्रीतशिवाय जिओ 4जी, GST, सुलतान, बाहुबली आणि बाजीगर नावाची गाढवे आली होती.
- राम रहीम आणि हनीप्रीतला घेऊन आलेल्या हरिओम प्रजापत यांनी सांगितले की, मला माझ्या गाढवांना ही नावे देण्याचा पश्चात्ताप होतोय, कारण गाढव निष्पाप असतात आणि ही नावे असलेली माणसे कुख्यात गुन्हेगार आहेत. या दोघांनी आपल्या वर्तणुकीमुळे धर्म आणि बाप-मुलीच्या नात्याला कलंकित केले आहे. 
- हरिओम म्हणाले, गुजरात ब्रीडचे हे दोन्ही गाढव एकाच व्यक्तीने खरेदी केले. मी त्यांच्यासाठी 21 हजारांची मागणी केली होती, पण सौदा 11 हजारांवर ठरला.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज....
बातम्या आणखी आहेत...