आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उज्जैनचे विद्यार्थी चालवणार ‘चंद्रा’वर सायकल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उज्जैन- उज्जैनच्या विद्यार्थ्यांना स्वत:च तयार केलेली सायकल चंद्रावर चालवण्याची संधी मिळणार आहे. अमेरिकेतील हंशविले येथे 25 ते 27 एप्रिलदरम्यान नासाच्या वतीने आयोजित वार्षिक ग्रेट मून बग्गी स्पर्धेत निवडक महाविद्यालयांच्या संघांशी त्यांची स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत जगातील निवडक 100 महाविद्यालयांचे संघ सहभागी होणार आहेत. त्यात उज्जैनच्या महाकाल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी पुनीत बदोका, दीपांग भार्गव, अंजली उपाध्याय आणि एमईचे विद्यार्थी पलाश पटोदी सहभागी होणार आहेत.

नासाच्या स्पेस सेंटरमध्ये तयार करण्यात आलेल्या चंद्राच्या पृष्ठभागावर (मून सर्फेस) ही बग्गी चालवण्याची स्पर्धा होणार आहे. त्या स्पर्धेत उज्जैनचे विद्यार्थी त्यांनी तयार केलेली ‘मून बग्गी’ही चारचाकी सायकल चालवणार आहेत. कमीत कमी वेळात ओबडधोबड रस्ते, खड्डे आणि चढउतार पार करून पुढे जाईल, तो या स्पर्धेचा विजेता ठरेल.

मानवी शक्तीवर चालते मून बग्गी : मून बग्गी पूर्णत: मानवी शक्तीवर संचलित होते. ती पेडलच्या साह्याने पायलट दीपांग आणि सहपायलट अंजली चालवणार आहेत. 25 हजार रुपये खर्च करून ही बग्गी तयार करण्यात आली आहे.

देशातील 10 संघ
या स्पर्धेसाठी देशातील 10 महाविद्यालयांची निवड करण्यात आली आहे. त्यात मध्य प्रदेशच्या दोन महाविद्यालयांचा समावेश आहे.

आर्मस्ट्राँग डिझाइन अवॉर्ड
चंद्राच्या पृष्ठभागासाठी अनुकूल असे अभियांत्रिकी तंत्रज्ञान सादर करणा-या संघाला नील आर्मस्ट्राँग डिझाइन अवॉर्ड देऊन गौरवण्यात येणार आहे.