आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unique Friendship: Radheshyam The \'caw\' Come Upon A Flock Of Crows Ratlam Indore Mp

PHOTO - एका आवाजावर येतात शेकडो कावळे; पितरांना जेऊ घालण्यास राधेशामची होते मदत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राधेशामने आवाज देताच आकाशात कावळ्यांचा थवा गिरक्या घालताना दिसतो.
इंदोर - श्राद्धाच्या वेळी पक्षांना जेऊ घालण्यासाठी कावळे शोधूनही सापडत नाही, मात्र रतलामच्या एका युवकाच्या आवाजावर या कावळ्यांचा थवाच त्याच्याजवळ येतो. या तरूणाच्या आवाजाच्या साह्याने पित्राच्या काळात अनेक लोक कावळ्यांना जेऊ घालतात. पाहूयात या अजब गजब रतलामच्या राधेशाम परसराम परमारबद्दल.
मालीकुआ येथील निवासी राधेश्याम 'कांव-कांव' असा आवाज काढतो आणि त्याच्या आजूबाजूला कावळ्यांची गर्दी जमते. श्राध्दावेळी पक्षांना जेऊ घालण्यासाठी कावळ्यांना जेऊ घालण्यात येते. यावेळी कावळ्यांना जेऊ घालण्यासाठी अन्न घेऊन गेलेल्या मनीष, संदीप, मोहित, राजू, दिनेश चौहान यांनी सांगितले की, राधेशामने एक आवाज दिला आणि कावळ्यांनी त्याच्याजवळ यायला सुरूवात केली. मग काय घरातून आणलेला डब्यातून कावळ्यांनी पोटभर जेवण केले.

गायी-म्हशी चरवताना झाली मैत्री -
राधेशाम हे एका शेतकरी कुटुंबातून आहेत. घरातील जनावरे चरवायचे काम राधेशामवर होते. जनावरे चरवायला घेऊन जाण्यासाठी राधेशामला दीड किलोमिटर दूर जावे लागायचे. राधेशाम या बद्दल बोलताना म्हणाला की, जेव्हा जनावरे चरत असतात त्यावेळी माझ्याजवळ काहीच काम नसते, तेव्हा मी त्या प्राणी-पक्षांचे आवाज ऐकत बसायचो. त्यानंतर मी त्यांच्या आवाजाचा सराव केला आणि हळू हळू मलाही त्यांचा आवाज काढता येऊ लागला. या कामात मला खुप आनंद मिळतो. यामुळेच कावळे माझा आवाज ऐकून माझ्याजवळ उडत येतात. सुरूवातीला या गोष्टीचे खुप कौतूक वाटायचे, आश्चर्य वाटायचे. मात्र आता हे नेहमीचेच झाले आहे. राधेशाम आता दररोज कावळ्यांसाठी घरातून भाकरी घेऊन जातो. तर कधी कधी कचोरी, समोसे तर कधी अजून काही असे वेगवेगळे पदार्थ तो नेतो आणि कावळेही आवडीने ते खातात. आता जवळपास हा दिनक्रम 6 वर्षांपासून नित्य चालू आहे.
श्राद्धाच्या काळात गर्दी वाढते
राधेशामच्या या गुणाचा आसपासच्या गावात चर्चा झाली. लोकांनाही राधेशामच्या या कलेचे कौतूक वाटते. श्राध्दाच्या दिवसांत तर अनेक आसपासचे लोक कावळ्यांसाठीचे जेवण घेऊन राधेशामच्या घरी पोहोचतात. दिवसभरात अनेक लोक घरात या दिवसांत भेट देत असल्याचे राधेशामने सांगितले. राधेशाम हे जेवण घेऊन जातो आणि कावळ्यांना आवाज देतो. तेव्हा कावळेही आनंदाने राधेशामच्या हाकेला धावून येतात. श्राद्धाच्या काळात लोकांचे हे महत्त्वाचे कार्य करून राधेशामला खुप पुण्य मिळते. आणि त्याच्या वडिलांनाही त्याच्या या गुणाचे कौतूक आहे.

फोटो- प्रदीप नागौरा