आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unique Wedding,Bride Gave Birth To The Child At The Venue, Bhopal News

लग्नमंडपातच नववधुची प्रसुती, नवरदेवाने नवजात शिशुसह स्वीकारले वधुला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ/जबलपूर- मध्‍यप्रदेशची राजधानी भोपाळपासून 466 किलोमीटर अंतरावर असलेल्या जबलपूरमध्ये एका सिनेमाच्या कथानकाला साजेशी आगळी- वेगळी घटना घडली आहे.

एक छोटेसे गाव. सनई चौघडे वाजताहेत. नवरदेवाने नुकताच लग्नमंडपात प्रवेश केलाय. परंतु अचानक नववधुला प्रसुती वेदना सुरु होतात. ती एका गोंडस बालकाला जन्म देते. परंतु हा सगळा प्रकार पाहुन मंडपात उपस्थित सगळे पाहुणे आवाक् होतात, आणि सुरु होतो संघर्ष. नवरदेवाचे कुटुंबीय भलतेच नाराज होते. नववधुबाबत काहीबाही बोलले जाते. वरात परत जाण्यास निघते. परंतु संयम राखत नवरदेव नवजात शिशुसह नववधुला स्विकारण्याचा निर्णय घेतो. त्याला प्रथम विरोध होतो. परंतु, त्यानंतर सगळे त्याच्या भावना समजून घेतात. अखेर शेवट गोड होतो. हे एखाद्या चित्रपटाचे कथानक नाही तर ही सत्य घटना जबलपूर जिल्ह्यातील डिण्डोरीपासून जवळच असलेल्या अझवार या गावात घडली आहे.

मानसिंह याचे अझवार या गावातील सुरेखासोबत (नाव बदललेले आहे.) लग्न ठरले होते. लग्नाची तारीख निश्चित झाली. लग्नाचा दिवस उजाडला. सुरेखाच्या घरी मंडप सजवला. मानसिंह वाजतगाजत वरात घेऊन सुरेखाच्या दारात आला. परंतु, नववधुला प्रसूती वेदना सुरु झाल्या. तिने एका बालकाला जन्म दिला.

नववधुने बाळाला जन्म दिलानंतर लग्नमंडपात उपस्थित पाहुण्यांमध्ये उलट सुलट चर्चा सुरु झाली. एवढेच नाही तर लग्नमंडपातच वधू आणि वरपक्षाचे कडाक्याचे भांडण झाले. बाचाबाची, त्यानंतर हाणामारी. काही वेळापूर्वी आनंदोत्सव साजरा करणारी मनं दुखावली जातात. त्यानंतर वरात परत जाण्यास निघाली. वधुपित्याने वरपक्षातील पाहुण्यासमोर लोटांगण घातले. तरी ते ऐकण्याच्या मनस्थिती नव्हते. अखेर नवरदेवाने स्वत: पुढाकार घेऊन वरात परत नेण्यास स्पष्ट नकार दिला. त्याच्या आईवडीलांची समजूत काढून नवजात शिशुसह नववधुला घेऊन अग्नीच्या साक्षीने सात फेरे घेतले. नववधु आणि नवजात शिशुला आपल्या घरी घेऊन गेला आणि वादावर पडदा पडला.

साखरपुड्यात सुरेखाला सातजन्म सोबत राहण्याचे वचन दिले होते. एक बालकाला तिने जन्म ‍दिला आहे. अशा नाजूक परिस्थितीत तिला सोडून गेलो तर मोठं पातक झाले असते, असे मानसिंहने सांगितले. विशेष म्हणजे नवजात शिशुला त्याने आपले नाव देण्याचाही निर्णय घेतला आहे.

मुलाच्या आनंदातच आमचा आनंद...
मानसिंहचे वडील जोधी सिंह म्हणाले, समाजासमोर आदर्श ठेवणार्‍या माझ्या मुलाचा मला अभिमान आहे. मानसिंहच्या या निर्णयाने दोन्ही कुटूंबियांची प्रतिष्ठा वाढवली आहे. त्याने नववधुला नवजीवन दिले आहे.