आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरएसएसच्या प्रांतीय बैठकीत स्वयंसेवकावर तरुणासोबत कुकर्माचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भिंड - मध्यप्रदेशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) प्रांतीय बैठकीत सहभागी होण्यासाठी आलेल्या एका तरुणासोबत आरएसएस स्वयंसेवकाने कुकर्म केल्याचे प्रकरण समोर आले आहे. पीडित तरुणाने स्वंयसेवक सोनू गर्गने त्याच्यासोबत कुकर्म केल्याचा आरोप केला आहे. या घटनेनंतर पीडित तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला.
पीडित तरुणाच्या वडीलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, 'माझ्या मुलासोबत 23 जुलै रोजी सोनू गर्गने हे कृत्य केले. याची तक्रार मी संघाचे जिल्हा प्रचारक आणि मंत्री लालसिंह आर्य यांच्यासह अनेक पदाधिकार्‍यांकडे केली. मात्र, त्यांनी मला चूप राहाण्याचा सल्ला दिला.'

संघाचा नकार
संघाने या कृत्याशी संबंध नसल्याचे म्हटले आहे. संघाचे जिल्हा कार्यवाह आनंद बरुआ म्हणाले, आरोपी युवकाचा संघाची संबंध नाही. तो काँग्रेस नेत्याचा मुलगा आहे.
कोण आहे सोनू गर्ग
आरोपी सोनू हा काँग्रेस नेते उमेश गर्ग यांचा मुलगा आहे. गर्ग यांनी विधानसभा निवडणुकीआधी भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. भाजपचे माजी खासदार अशोक अर्गल यांचे निकटवर्तीय म्हणून उमेश गर्ग ओळखले जातात.
पुढील स्लाइडमध्ये, आर्य म्हणाले, प्रकरण संघाशी संबंधीत आहे. जास्त हवा देऊ नका

छायाचित्र - हॉस्पिटलमध्ये दाखल पीडित तरुण.