आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uttar Pradesh Kalimulla Khan Developed 300 Varieties Of Mango

एका झाडावर लगडले ३०० प्रकारचे आंबे,सेलिब्रेटीजच्या नावाने वाण विकसित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - त्यांचे वय आहे जवळपास ७५ वर्षे. पैकी ६८ वर्षे त्यांनी फळांचा राजा आंब्यावर प्रेम करण्यात घालवले आहेत. प्रत्येक 'आंबा' त्यांच्या प्रयोगशीलतेमुळे "खास' बनला. त्यामुळे आंब्याचा जादूगार म्हणून त्यांना आेळखले जाते. त्यांनी सांगितले की, आतापर्यंत मी ११ पेक्षा जास्त प्रकारचे आंब्याचे वेगवेगळे वाण शोधून काढले व त्यांना वेगळी ओळख मिळवून दिली. यात नरेंद्र मोदी, सचिन तेंडुलकर, ऐश्वर्या रॉय, अखिलेश यादव यांच्या नावानेही आंब्याचे वाण विकसित
केले आहेत.
आंब्याला खास बनवणारे हे व्यक्ती आहेत उत्तर प्रदेशातील मलिहाबादचे कलिमुल्ला खान. ७५ वर्षीय कलिमुल्ला खान इंदूर येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आंब्याचा "खास' प्रवास सांगितला. त्यांनी सांगितले की, ते जेव्हा सहा-सात वर्षांचे होते तेव्हा वडिलांसोबत आंब्याच्या बागांमध्ये जात असे. तेथे आंब्याची शेकडो झाडे होती. आंबे बघताना - खाताना हळूहळू वडिलांच्या मार्गदर्शनाखाली आंब्यावर प्रयोग करायला लागलो. तेव्हापासून वडिलांचा बगिचा नर्सरी व प्रयोगशाळेत कधी व कसा बदलला गेला तेच समजले नाही. लखनऊ येथून १६ किलोमीटरवरील नर्सरी ही बहुधा देशातील पहिलीच आंब्याची प्रयोगशाळा आहे.
मित्राच्या बोलण्यातून प्रेरणा
त्यांच्या नर्सरीमध्ये एक आंब्याचे असे झाड आहे की, ज्यावर वेगवेगळ्या ३०० प्रकारचे आंबे लागतात. अशा प्रकारचे हे जगातील एकमेव झाड आहे, असा दावा कलिमुल्ला यांनी केला. ते सांगतात की, २५ वर्षांपूर्वी एका मित्राने विचारले की जर गुलाबाच्या रोपावर दोन वेगवेगळ्या प्रकारची फुले लागू शकतात तर मग आंब्याच्या झाडावर तसे का होऊ शकत नाही? मित्राचे ते म्हणणे कलिमुल्लांच्या डोक्यात पक्के बसले व त्यांना प्रयोग करायला भाग पाडले. कलिमुल्ला यांनी आंब्याच्या नऊ वर्षे जुन्या झाडाला प्रयोगाचे माध्यम बनवले. पहिला प्रयोग अयशस्वी ठरला, परंतु नंतर ग्राफ्टिंगचे नवनवीन मार्ग शोधले. चार वर्षांच्या परिश्रमानंतर पहिला प्रयोग यशस्वी ठरला.
नंतर सुरू झालेला सिलसिला आजतागायत अखंड सुरू आहे.
गुलाबी छटा असलेला 'नमो'
कलिमुल्ला यांनी नुकतेच आंब्याचे एक नवे वाण िवकसित केले आहे. त्याला त्यांनी "नमो' असे नाव दिले आहे. त्याची साल गुलाबी रंगाची आहे, तर आतील रंग केशरी आहे. "नमो' आंबा खूप गोड नाही, परंतु वजनदार आहे. ते सांगतात की, नरेंद्र मोदी आयुष्यभर पीएम राहणार नाहीत, परंतु माझ्या आंब्याला दिलेले त्यांचे नाव कायम राहील. अशाच प्रकारे त्यांनी आंब्यांना अभिनेत्री ऐश्वर्या राय, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची नावे दिली आहेत. या सर्व आंब्यांमध्ये अशी काही वैशिष्ट्ये आहेत ती इतरांपेक्षा वेगळी व खास असल्याचे पाहताक्षणी लक्षात येते.