आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vaishya Ahead In Business , Social Work Shivraj Singh

व्यवसाय, समाजसेवेत अग्रेसर असतो तो वैश्य - शिवराजसिंह चौहान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - वैश्य समाज केवळ व्यापार, व्यवसाय किंवा औद्योगिक क्षेत्रातच नव्हे तर समाजसेवा आणि राष्ट्रसेवेतही अग्रेसर आहे. जो व्यापार, व्यवसाय आणि समाजसेवेत उत्कृष्ट असतो तो खरा वैश्य असल्याचे प्रतिपादन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी इंदूरमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय वैश्य महासंमेलनाच्या कार्यसमितीच्या बैठकी वेळी केले. इंदूरच्या रवींद्र नाट्यगृहात शनिवारी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी वैश्य समाजाचे मंत्री, आमदार, उल्लेखनीय कामगिरी करणारे व्यक्ती, प्रतिभावंत, ज्येष्ठ नागरिक तसेच समाजसेवकांचा सन्मान करण्यात आला. पंजाबचे आरोग्य मंत्री मदनमोहन मित्तल हे या महासंमेलनाचे प्रमुख अतिथी होते.
वैश्य समाजासाठी चांगली मदत करण्याची इच्छा व्यक्त करत व्यापार उद्योगात उद्भवणार्‍या अडचणी दूर करण्याचे आश्वासनही चौहान यांनी या वेळी दिले. भास्कर समूहाचे अध्यक्ष आणि महासंमेलनाचे कार्यकारी अध्यक्ष रमेशचंद्र अग्रवाल म्हणाले की, पुढील पाच वर्षांत मध्य प्रदेशला देशातील सर्वात विकसित राज्य बनवायचे असून यात वैश्य समाजाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल. फक्त कृषी क्षेत्राचा विकास होऊन चालणार नाही तर उद्योग व्यवसायदेखील महत्त्वपूर्ण असल्याचे अग्रवाल या वेळी म्हणाले.
आतापर्यंतची सर्वांत यशस्वी बैठक
कार्यसमितीच्या आतापर्यंतच्या बैठकींपैकी इंदूर येथे आयोजित बैठक ही सर्वांत यशस्वी असून त्यामुळे इतिहास रचला गेला असल्याचे मनोगत महासंमेलनाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास अग्रवाल यांनी व्यक्त केले.
विविध लोकांचे सत्कार
मंत्री- उमाशंकर गुप्ता, कैलाश विजयवर्गीय, जयंत मलैया, पारस जैन, ब्रिजमोहन मित्तल (छत्तीसगड), अमर अग्रवाल (छत्तीसगड), मदनमोहन मित्तल (पंजाब) आणि खासदार विवेक गुप्ता (कोलकाता)
आमदार- सुदर्शन गुप्ता, प्रदीप अग्रवाल, निशंककुमार जैन, चैतन्य कश्यप, दुर्गालाल विजय, अनिल जैन (टिकमगड), मनोहर अग्रवाल (अनुपपूर), गिरीश भंडारी.
सन्मानित व्यक्ती- प्रेमचंद गोयल, कांता रामरतन अग्रवाल, अनिल खंडेलवाल, ओमप्रकाश बंसल, विनोद अग्रवाल, डॉ.पंकज गुप्ता, ब्रिजमोहन गुप्ता, राजेश सुहाणे, ओमप्रकाश बंसल, सुशीलाराणी मित्तल, शैलेश कठल, विष्णू बिंदल, टिकमचंद गर्ग, सुभाषजी फार्मा, शिवनारायण भुतडा, अरुण खरया, वी.आर.गोयल, आर.एल.गुप्ता, गोविंद गोयल, नारायण अग्रवाल आदी.
मदत- आयएएस आणि आयपीएस परीक्षेसाठी तयारी करत असलेली अपूर्वा परवार, अंशुल अग्रवाल आणि रवी गुप्ता यांना या वेळी सन्मानित करण्यात आले तसेच प्रत्येकी एक लाख रुपयांची मदतही देण्यात आली.