आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vaishya Mahasammelan Held In Indore From 3 To 5 Junary

वैश्य महासंमेलनाची इंदूरमध्ये तीन ते पाच जानेवारी दरम्यान राष्‍ट्रीय बैठक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - आंतरराष्‍ट्रीय वैश्य महासंमेलनाच्या राष्‍ट्रीय कार्यकारिणीची बैठक तीन ते पाच जानेवारीदरम्यान इंदूरमध्ये आयोजित करण्यात आली आहे. यात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय पातळीवरील वैश्य समाजाचे नेते, पदाधिकारी सहभागी होणार आहेत, अशी माहिती आंतरराष्‍ट्रीय वैश्य महासंमेलनाचे राष्‍ट्रीय अध्यक्ष रामदास अग्रवाल यांनी दिली.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते या बैठकीचे उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी मध्य प्रदेश व छत्तीसगडमधून विजयी झालेल्या वैश्य समाजाच्या 30 आमदार व मंत्र्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच आयएएस परीक्षेची तयारी करणा-या पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1 लाख रुपये देऊन गौरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उच्च शिक्षणमंत्री व मध्य प्रदेशातील वैश्य महासंमेलनाचे अध्यक्ष उमाशंकर गुप्ता तसेच नगरविकासमंत्री कैलास विजयवर्गीय हे या बैठकीच्या यशस्वितेसाठी प्रयत्न करत आहेत.
अग्रवाल यांनी सांगितले की, कार्यसमितीच्या या बैठकीत लोकसभेच्या आगामी निवडणुकीसंदर्भात राजकीय परिसंवाद ठेवण्यात आला आहे.जेणेकरून वैश्य समाजबांधव राजकीय क्षेत्रात अधिकाधिक सक्रियपणे सहभाग घेऊन योगदान देऊ शकतील. देशाच्या बिघडत्या आर्थिक स्थितीबाबतही यात चर्चा होणार आहे. संमेलनाचे विदेशी चॅप्टर सुरू करण्याची प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून दुबई, नेपाळ व थायलंडला प्रतिनिधी मंडळ पाठवण्याबाबत या तीनदिवसीय बैठकीत निर्णय अपेक्षित आहे.
राजस्थानात 16 वैश्य आमदार विजयी
आंतरराष्‍ट्रीय वैश्य महासंमेलनाच्या राजस्थान शाखेतर्फे जानेवारीच्या तिस-या आठवड्यात प्रादेशिक वैश्य महासंमेलन घेण्यात येणार आहे. यात राजस्थानातून निवडून गेलेल्या वैश्य मंत्री, आमदारांचा तसेच ज्यांनी निवडणूक लढवली, अशांचा सत्कार करण्यात येणार आहे. राजस्थानातून या वेळी वैश्य समाजाचे 16 आमदार निवडून आले आहेत.