आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोपाळ गँगरेप: त्यांना जिवंत राहण्याचा हक्क नाही, भरचौकात फाशी द्या- पीडित तरुणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - येथे गँगरेप झालेल्या पीडितेने पहिल्यांदा मीडियासमोर येऊन जबाब दिला. ती म्हणाली, "चारही नराधमांना जिवंत राहण्याचा हक्क नाही, त्यांना भरचौकात फाशी लटकवले पाहिजे. जर ते सुटून बाहेर आले तर पुन्हा रेप करतील." 
 
>पीडितेने नाराजी व्यक्त करत म्हटले, "पोलिसांचे वर्तन सर्वात जास्त वाईट होते. पूर्ण दिवस आम्ही भटकत होतो, पण कुणीच ऐकले नाही. जीआरपी पोलिसांती टीआय अंकल खूपच असभ्य होते, त्यांनी माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. जर पोलिसांनी सहकार्य केले असते तर चारही आरोपींना त्याच दिवशी पकडता आले असते." 
>तथापि, 31 ऑक्टोबरच्या संध्याकाळी हबीबगंज स्टेशनकडे येथे जात असलेल्या यूपीएससी स्टुडंटसोबत 4 नराधमांनी गँगरेप केला होता. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी एफआयआर दाखल करण्यात आली होती.
 
आरोपी पकडायला गेले, तर लोकांनी केला हल्ला
> पीडितेने म्हटले, हबीबगंज पोलिसांनी थोडी मदत केली, पण एमपीनगर आणि जीआरपी पोलिसांनी कोणतीही मदत केली नाही. आम्ही आरोपींना पकडण्यासाठी गेलो तेव्हा वस्तीतील लोकांनी आमच्यावर हल्ला केला होता, पण पप्पांनी त्या आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
> एका व्हिडिओमध्ये पाहिले की, जीआरपीच्या एसपी अनिता मालवीय हसत आहेत, त्यांना माझ्या अत्याचारावर हसू येत आहे. यावरून त्या असंवेदनशील असल्याचे स्पष्ट दिसतेय. त्याही एक महिला आहेत आणि रेल्वे पोलिसांतील एसपी आहेत. तरुणी म्हणाली की, भोपाळमध्ये मुली कशा सुरक्षित राहतील, जर पोलिसांतील एक एसपीच असे हसत असतील?"
>"माझे आईवडील दोघेही पोलिसांत आहेत. जर आमच्यासोबत असे झाले, तर विचार करा इतरांचे काय होत असेल."
 
काय आहे प्रकरण?
भोपाळमध्‍ये कोचिंग क्‍लासहून परतणा-या 19 वर्षीय विद्यार्थीनीसोबत 31 ऑक्‍टोबररोजी गँगरेप झाला होता. संध्‍याकाळी 7.30च्‍या सुमारास ही घटना घडली. 4 नराधमांनी तब्‍बल 3 तास मुलीवर अत्‍याचार केला. मात्र जवळच असलेल्‍या पोलिस स्‍टेशनला याचा सुगावाही लागली नाही. शेवटी कसेबसे पीडित तरुणी रात्री 10 वाजता आरपीएफ ठाण्‍यामध्ये पोहोचली. तरीही रेल्‍वे पोलिसांनी काहीही केले नाही. बुधवारी सकाळी पिडीता आणि तिचे आई-वडील एमपीनगर पोलिस स्‍टेशनमध्‍ये गेले. मात्र तेथेही तक्रार नोंदवून घेण्‍यास पोलिसांनी नकार दिला. तक्रार नोंदवण्‍यासाठी पालक आरपीएफ, एमपी नगर पोलिस स्‍टेशनदरम्‍यान चकरा मारत राहिले. अखेर मोठ्या मुश्किलीनंतर हबीबगंज पोलिस स्‍टेशनमध्‍ये पीडितेची तक्रार नोदंवून घेण्‍यात आली. तोपर्यंत घटना घडून 24 तास उलटून गेले होते.
 
पालकांनी पकडले आरोपीला
> एमपीनगरहून हबीबगंज ठाण्‍यात जात असताना पीडितेचे कुटुंब काही वेळ एका कॉम्‍प्लेक्‍स जवळ थांबले होते.
> तेवढ्यात तेथे एका झोपडीत राहणा-या गोलू नावाच्‍या आरोपीवर पिडीतेची नजर गेली. तिने तेव्‍हाच ओरडून ही बाब आपल्‍या वडीलांना सांगितली. त्‍यांनतर आई-वडीलांनी मिळून आरोपीला पकडले व त्‍याला हबीबगंज पोलिस स्‍टेशनमधे नेले. पोलिसांना सर्व माहिती सांगितल्‍यावर पोलिसांनी आरोपीची चौकशी सुरु केली. त्‍यानंतर काही वेळातच पोलिसांनी दुस-या आरोपीला पकडून आणले. त्‍याच्‍याकडून पिडीतेचा मोबाईल आणि कानाचे झुमके मिळाले.
> त्‍यानंतर अधिक तपासाठी हबीबगंज पोलिस स्‍टेशनचे अधिकारी घटनास्‍थळी गेले. जीआरपी पोलिसांनाही त्‍यांनी बोलावून घेतले.
 
पोलिसांची असंवेदनशिलता, कुटुंबाला मारायला लावल्‍या चकरा
> घटनेनंतर पोलिसांच्‍या असंवेदनशीलतेचा चेहराही समोर आला आहे. पोलिस स्‍टेशनमध्‍ये तक्रार देण्‍यासाठी गेलेल्‍या पिडीतेच्‍या कुटुंबाला पोलिसांनी वेगवेगळ्या स्‍टेशनच्‍या चकरा मारायला लावल्‍या.
> प्रथम भोपाळ पोलिस स्‍टेशनमध्‍ये गेलेल्‍या या कुटुंबाला तेथील पोलिसांनी हे प्रकरण आमच्‍या हद्दीत येत नाही म्‍हणत तेथून जायला सांगितले. यांनतर हे कुटुंब जवळभर तासभर एमपी नगर पोलिस स्‍टेशन आणि हबीबगंज पोलिस स्‍टेशनच्‍या चकरा मारत होते. यानंतर त्‍यांना सांगण्‍यात आले की, हे प्रकरण जीआरपी स्‍टेशन अंतर्गत येते. अखेर जीआरपी स्‍टेशनमध्‍ये पिडीतेची वैद्कीय तपासणी करुन आरोपींविरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. वैद्कीय तपासणीमध्‍ये पिडीतेवर बलात्‍कार झाला असल्‍याचे सिद्ध झाले.

तिची हत्‍या करणार होते आरोपी
> पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनूसार, पिडीता भोपाळमधील एमपीनगर परिसरातील कोचिंग क्‍लासमध्‍ये युपीएससीची तयारी करत आहे. 31 ऑक्‍टोबररोजी संध्‍याकाळी 7.30 वाजता ती कोचिंग क्‍लास संपवून घरी येत होती. तेव्‍हाच रेल्वे स्‍टेशनजवळ 4 मुलांनी तिला घेरले. प्रथम त्‍यांनी तिच्‍याशी छेडछाड केली. नंतर तिला धमकावून झुडुपांमध्‍ये नेत नराधमांनी तिच्‍यावर गँगरेप केला.
> गँगरेपनंतर आरोपींना पिडीतेची हत्‍या करायची होती, मात्र कसेतरी करुन तिने तेथून पळ काढला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...