आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्यप्रदेशात बलात्कारानंतर युवतीची 70 फुटांच्या टॉवरवरुन उडी, पोलिसांनी ठरवले वेडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीना - मध्यप्रदेशातील बीना येथे बलात्काराची शिकार झालेल्या एका युवतीने 70 फूट उंच टॉवरवरुन उडी घेतली. तिच्या मृ्त्यूच्या दोन दिवसानंतरही पोलिसांना या प्रकरणी ना ठोस पुरावा मिळाला, ना एकाही आरोपीला ते अटक करु शकले. पोलिसांनी उलट युवतीलाच विक्षिप्त आणि वेडी ठरवून प्रकरण गुंडाळण्याचा प्रयत्न चालवला आहे. ह्रदय पिळवटून टाकणारी ही घटना सोमवारी घडली. बुधवारी पॉस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर या घटनेचा खुलासा झाला आहे.
पोलिस अधिक्षकांचे म्हणणे आहे, की पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून फक्त शारीरिक संबंध ठेवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. बलात्कार झाला किंवा नाही ते तपासांती स्पष्ट होईल. तर, दुसरीकडे पॉस्टमॉर्टम करणार्‍या पॅनलमधील डॉ. बलबीर कॅथोरिया यांचे म्हणणे आहे, की युवतीवर बलात्कार झाला होता.

तिच्या शरीरावर 'स्ट्रगल साइन' दातांच्या खुना आणि ओरखाडे होते. टॉवरवरुन उडी घेतल्याने तिच्या बरगड्या (फासळ्या) तुटल्या आणि पाय देखील फ्रॅक्चर झाला होता. बलात्कार सामुहिक होता की एका व्यक्तीने केलेला हे तपासण्यासाठी व्हॅजायनल सँपल घेण्यात आले आहे.
पोलिसांचे हातावर हात
डॉ. कॅथोरिया यांना सांगितले, 'पोस्टमॉर्टम पॅनलने रिपोर्ट तयार केल्यानंतर बुधवारी दुपारी 1.30 वाजता मी स्वतः पोलिस स्टेशनला फोन करुन रिपोर्ट घेऊन जाण्यास सांगितले. मात्र, रात्री उशिरापर्यंत कोणीही आले नाही.' पोलिसा अधिकारी जितेंद्र सिंह म्हणाले, 'तपास अधिकार्‍याने रिपोर्ट का आणला नाही, हे माहित नाही. रिपोर्ट आल्यानंतर संबंधीत पोलिस स्टेशनचे अधिकारी एम.ए. सय्यद यांनी तपास सुरु केला आहे.'

पोस्टाच्या परीक्षेला निघाली होती युवती
डिंडोरी जिल्ह्यातील तरछ येथे राहाणारी 19 वर्षीय युवती शहडोल येथे शिक्षण घेत होती. 22 जून रोजी जबलपूर पोस्ट ऑफिसच्या परीक्षेसाठी इंदूरला निघाली होती. युवतीच्या वडिलांनी सांगितले, '29 जून रोजी मी फोन केला तेव्हा तिचा फोन बंद होता. ती बीना येथे कशी गेली हे माहित नाही.'
जितेंद्र सिंह म्हणाले, 'मृत्यूपूर्वी एक दिवस आधी युवती रेल्वेस्टेशनवर एका युवकासोबत आढळली होती. त्या दिशेने आता तपास सुरु केला आहे.'

काय झाले होते सोमवारी
औरीया गावातील प्रत्यक्षदर्शी संजय यांच्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सहा वाजता एक निर्वस्त्र युवती झाडामागे उभी होती. लोक जमा होऊ लागल्यानंतर ती पळत मंदिरामागे लपली. गर्दी पुन्हा तिच्या दिशेने गेली, तेव्हा ती धावत हायटेंशन टॉवरवर चढली. जमाव पोहोचेपर्यंत ती तारांना लटकली. तिला वाचवण्यासाठी एक युवक टॉवरवर चढला मात्र तिचा हात तारांवरुन निसटला आणि खाली पडल्याबरोबर तिचा मृत्यू झाला. त्याच परिसरात एक बॅग सापडली त्यावरुन तिची ओळख पटली.

(छायाचित्र - औरीया गावातील याच मंदिराच्या मागे युवतीची बॅग सापडली)