आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • View Photos Of Women Romance Ghost Of Some Fuckin Lowered His Head

नारीशक्तीने असा उचलला हात, की मजनू म्हणाला बाप रे बाप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदुर (मध्य प्रदेश)- धार रोडवरील नावदा पंत येथील वस्तीत 14 वर्षीय मुलीला "आय लव्ह यू" म्हणणाऱ्या एका मजनू दुकानदाराला महिलांनी चंदननगर पोलिस ठाण्याच्या परिसरात चक्क चपलांनी चोप दिला. पोलिसांनी दुकानदाराला अटक केली असून तक्रार दाखल करून घेतली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव सुरेश आहे. तो 35 वर्षांचा आहे. त्याच्या दुकानात किराणामालाचे सामान घेण्यासाठी एक 14 वर्षीय मुलगी आली होती. यावेळी त्याने तिचा हात धरला. "आय लव्ह यू" म्हटले. माझ्या प्रस्तावावर येत्या 15 दिवसांत उत्तर देण्याचे तिला सांगितले. त्यानंतर मुलगी रडत रडत घरी गेली. तिने घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितला. तिचे आई-वडिल दुकानात गेले तर त्याने त्यांची माफी मागितली. परंतु, स्थानिक महिलांनी सुरेशवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.

त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याला पोलिस ठाण्यात आणलेले बघून महिलांनी चपला काढून जोरदार मारहाण केली. महिलांचा रोष बघून पोलिसांनीही मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला नाही.

नारीशक्तीचा रोष बघण्यासाठी पुढील स्लाईड्सला क्लिक करा...