Home »National »Madhya Pradesh» Vigilance Orders To School Regarding Blue Whale Games

मध्य प्रदेशातील शिक्षण समितीने शाळांना दिले ब्ल्यू व्हेल गेमसंदर्भात दक्षतेचे आदेश

वृत्तसंस्था | Sep 27, 2017, 04:07 AM IST

  • मध्य प्रदेशातील शिक्षण समितीने शाळांना दिले ब्ल्यू व्हेल गेमसंदर्भात दक्षतेचे आदेश
भाेपाळ -मध्य प्रदेश राज्य शिक्षा केंद्राच्या वतीने राज्यातील सर्व माध्यमिक व प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना जीवघेण्या ब्ल्यू व्हेल गेमपासून विद्यार्थ्यांना दूर ठेवण्याची दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत. ब्ल्यू व्हेल गेममुळे देशभरात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढते आहे, यावर समितीने चिंता व्यक्त केली आहे.
राज्यातील शिक्षण खात्यात राज्य शिक्षा केंद्र ही स्वायत्त संस्था असून या संस्थेने विद्यार्थ्यांना शाळांमध्ये मोबाइल वापरास बंदी घालण्याची सूचना केली आहे. ब्ल्यू व्हेल गेम हा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमाकडून चालवण्यात येतो. यामध्ये मुलांना सहभागी करून घेण्यात येत आहे. या जीवघेण्या खेळातून मुलांना बाहेर काढणे अवघड बनले आहे. या खेळामुळे काही विद्यार्थ्यांनी आत्महत्याही केल्या आहेत. मोबाइलपासून निघणाऱ्या किरणोत्सर्गामुळे आणि ब्ल्यू व्हेल गेमचा विपरीत परिणाम मुलांच्या मनावर होतो आहे, असे राज्य शिक्षा केंद्राने प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
पालकांनीही जागरूक राहावे
यासंदर्भात पालक मेळावे घेण्यात यावेत आणि मुलांना या गेमपासून दूर ठेवण्याची आटोकाट काळजी घेण्याविषयी सांगण्यात यावे. ब्ल्यू व्हेल गेम हा आत्महत्येस प्रवृत्त करणारा खेळ आहे. हा गेम खेळणाऱ्यास ५० दिवसांत टास्क पूर्ण करायचे असतात.

हरियाणात १७ वर्षीय मुलाची ब्ल्यू व्हेल गेममुळे आत्महत्या
हरियाणातील पंचकुला येथे शनिवारी एका १७ वर्षीय मुलाने गळफास घेतला. हा मुलगा ब्ल्यू व्हेल गेम खेळत असावा, असे पोलिसांनी सांगितले. अन्य एका घटनेत गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूर येथे एका ३० वर्षे वयाच्या व्यक्तीने ब्ल्यू व्हेल गेममुळे आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत लिहून ठेवले हाेते.

Next Article

Recommended