आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Villagers Love Bull Like Son, Feeding Chocolate And Biscuits

लाडू,चॉकलेट आणि समोसे खातो हा नंदी; गावातील सगळेच पुरवतात त्याचे लाड!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खरगोन- मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील पंधान्या गावातील लोकांना एका 17 महिन्यांच्या नंदीचा (बैल) चांगलाच लळा लागला आहे. गावातील सगळे लोक या नंदीचे आपल्या मुलांप्रमाणे लाड पुरवतात. या नंदीचे नाव सोमनाथ आहे. विशेष म्हणजे सोमनाथ लाडू, चॉकलेट आणि समोसे फार आवडतात.
सोमनाथ आधी महेश्वर येथील चिंतामणी गणेश मंद‍िरातील पुजारी राजेंद्र प्रसाद तिवारी यांच्या घरी राहात होता. परंतु पंधान्या गावात गोवंश वाढावा या उद्देशाने शेतकरी माधव पाटीदार यांनी सोमनाथला आणले आहे.

सोमनाथ गेल्या दोन महिन्यांपासून पंधान्या गावात राहत आहे. परंतु त्याने अल्पावधीतच सगळ्यांना आपलेसे केले आहे. पुजारी तिवारी यांच्याकडे सोमनाथचा मोठा थाट होता. त्याला दररोज लाडू-पेढे खाण्यासाठी मिळत होते. त्यामुळे सोमनाथला गावातील प्रत्येक घरातील महिला-पुरुष काही ना काही भरवतात.
पंधान्या हे गाव तसे छोटेच आहे. गावात 350 घरे असून 95 टक्के लोक शेती करतात. गोवंश वाढावा या उद्देशाने सोमनाथला पंधान्या गावात आणले आहे. सोमनाथ हा 'साहीवाल' या जातीचा बैल आहे. साहीवाल ही बैलाची जात पंजाबमध्ये आढळते. साहीवाल जातीच्या बैलाचे वजन 450 ते 500 किलोग्रॅम तर गाईची वजन 300 ते 400 किलोग्रॅम असते. या जातीच्या बैलाचे पाय छोटे, सशक्त शरीर, लहान शिंगे असतात. या बैलाचा रंग लाल अथवा गडद राखाडी असतो. साहीवाल जातीच्या बैलात जास्त वजन वाहून नेण्याची क्षमते असते.
पुजारी तिवारी पाठवतात सोमनाथसाठी खाद्यपदार्थ...
पुजारी तिवारी यांच्याकडून महिन्यांतून दोनदा सोमनाथसाठी खाद्यपदार्थ पाठवले जाते. एक लोडिंग रिक्क्षा भरून सोमनाथसाठी मोतीचूरचे लाडू, चॉकलेट, मोदक, समोसे, कचोरी तसेच हिरवे गवत पाठवले जाते. तिवारी यांचे कुटूंबियही सोमनाथला आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे लाड करतात.
पुढील स्लाइड्‍सवर वाचा, पंजाबमधील महागड्या दोन रेड्यांविषयी, एक पितो दूध तर दुसर्‍याला पाजली जाते मद्य...