आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाचोऱ्याचा ठक विनोद पाटलास इंदुरात अटक, जळगावात केली २०० कोटींची फसवणूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - चारराज्यांत हायटेक कंपनी उघडून दोन हजार कोटींची फसवणूक करणारा पाचोरा येथील ठक विनोद पाटील याला इंदूरमध्ये रविवारी अटक करण्यात आली. वर्षभराची भाजी अर्ध्या किमतीत देण्याचे आमिष दाखवून तो फसवणूक करत होता.
पाचोरा तालुक्यातील जारगावचा असलेला विनोद पाटील (३७) त्याची कथित पत्नी रिमन शर्माने जळगाव जिल्ह्यातही २०० कोटींची फसवणूक केली अाहे. वर्षभरात पैसे दुप्पट करून देण्यासह विविध अामिषे दाखवून दाेघे फसवणूक करत हाेते. ताे गुजरातमध्ये पसार झाला हाेता. इंदूरमध्ये गेल्यावर त्याने चेन सिस्टिम पद्धतीने फसवणूक सुरू केली हाेती. त्याने शहरात फ्री सेव्हियर सर्व्हंट सर्व्हिसेस नावाने व्यवसाय सुरू केला. वेगवेगळ्या नावांनी ताे कंपनीचे संचालक तयार करत हाेता. इंदूर पाेिलसांनी विनाेद, रिमन त्यांचा सहकारी अाकाश याज्ञिकला अटक केली.
आरोपीने इंदूर शहरात अनेक िठकाणी लक्झरी कार्यालय सुरू केले हाेते. शहरातील व्यापाऱ्यांशी टायअप करून त्याने ४० व्यापाऱ्यांकडून प्रत्येकी ५० हजार रुपये जमा करून त्यांना पार्टनर केले हाेते. तसेच ८० जणांना एक्झिक्युटिव्ह बनवून १५ लाखांपेक्षा जास्त रक्कम जमवली हाेती. त्याने फसवणूक करून सहा महिन्यांत ६० काेटी रुपये जमा केल्याचे पाेिलस डीअायजी संताेषसिंह यांनी सांगितले. अाराेपीने दिल्लीत १५००, पाचाेऱ्यात २०० बंगळुरूत २०० काेटींची फसवणूक केली. दिल्लीत 'स्पीक अाशिया' नावाने ऑनलाइन मल्टिलेव्हल मार्केटिंग कंपनी सुरू करून फसवणूक केली.