आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापमं घोटाळ्याचे धागेदोरे संघाच्या बड्या नेत्यांपर्यंत! सीबीआय चौकशीला सुरुवात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - मध्य प्रदेशातील बहुचर्चित व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) घोटाळ्यात सीबीआयने बुधवारी दोन एफआयआर नोंदवले. या घोटाळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बडे नेतेही गुंतले असल्याचेही उघडकीस येत असल्यामुळे या घोटाळ्याला नवी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी व्यापमं घोटाळ्यातील आरोपी सुधीर शर्मा याच्याकडून आर्थिक देवाण- घेवाण केल्याचा आरोप झाला आहे. काँग्रेसने प्राप्तिकर खात्याचा हवाला देऊन संघाच्या नेत्यांचाही या घोटाळ्यात हात असल्याचे पुरावे दिले आहेत. संघाचे संयुक्त सरचिटणीस सुरेश सोनी, धर्मेंद्र प्रधान, प्रभात झा आणि त्यांची दोन मुले आणि भाजप खासदार अनिल दवे यांच्या विमान प्रवासाच्या तिकिटांबरोबरच अन्य खर्चही सुधीर शर्माने वारंवार केल्याचे उघडकीस आले आहे.
सीबीआयने या प्रकरणी दाखल केलेल्या दोन एफआयआरमध्ये २९ लोकांना आरोपी केले आहे. त्यांच्याविरुद्ध फसवणूक आणि गुन्हेगारी कटाचा आरोप आहे.
पुढील स्लाइडमध्ये, सीबीआय चौकशीला सुरुवात; आरोपींत मागासवर्गीय आयोग सदस्य
बातम्या आणखी आहेत...