ग्वाल्हेर - 'जॉली एलएलबी' चित्रपटात नायक एक जुन्या स्कूटरवर बसलेला असतो आणि त्याचा सुरक्षा रक्षक रायफल सावरत त्या स्कूटरला धक्का देत असतो. असेच काहीसे चित्र गुरुवारी शहरात पाहायला मिळाले. राज्याला हदरवून सोडणारा घोटाळा उघड करणाऱ्या तरुणाच्या सुरक्षेत तैनात पोलिस सायकलवर त्याचे मागे बसलेले होते. कधी-कधी हे पोलिस स्वतः बाइक चालवतात आणि तरुण मागच्या सीटवर बसलेला असतो. अशा स्थितीत त्याचे संरक्षण कसे करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसे पत्रच त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना लिहिले आहे.
काय आहे पत्रात ?
साहेब, आम्ही आशीष चतुर्वेदी यांच्या सुरेक्षेत तैनात आहोत. आम्हाला या कामासाठी बाइक आणि शस्त्र देण्यात आले आहेत. पण आशिष यांना बाइक चालविता येत नाही. त्यामुळे त्यांना मागच्या सीटवर बसवून बाइक आम्हाला चालवावी लागते. अशा परिस्थितीत आम्ही त्यांची सुरक्षा कशी करणार. आम्हाला दिलेल्या प्रशिक्षणातही याचा अंतर्भाव नव्हता... अशा आशयाचे पत्र व्यापमं घोटाळा उघड करणारे आशीष चतुर्वेदी यांच्या सुरक्षेत तैनात दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी पोलिस अधिक्षक राहुल लोढा यांना पाठवले आहे.
व्यापमं घोटाळा उघड करणारे आशिष यांना चोविस तास पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. त्यासाठी बाइक आणि शस्त्रांसह दोन अंगरक्षक तैनात केले गेले आहेत. आशिष यांना बाइक चालविता येत नाही, त्यांचे रोजचे जाणे-येणे सायकलवर असते. अशा परिस्थितीत आशीष सायकल चालवतात आणि त्यांचे अंगरक्षक मागे बसून त्यांचे संरक्षण करतात. काही वेळेस अंगरक्षक बाइक चालवता आणि आशीष मागे बसलेले असतात. कारण त्यांना स्वतःला बाइक चालविता येत नाही. सुरक्षेच्या दृष्टीने हे योग्य नाही. कारण जर अंगरक्षक बाइक चालवत असताना मागून येऊन कोणी हल्ला केला तर त्यावेळी त्यांचे संरक्षण करणे अशक्य आहे.
गुरुवारी आशीष यांच्या दोन्ही अंगरक्षकांनी कमांडर हरिप्रसाद तिवारी आणि रामलखन शर्मा यांनी त्यांच्या अडचणी पत्राच्या माध्यमातून पोलिस अधिक्षकांसमोर मांडल्या. त्यांचे म्हणणे आहे, की आम्हाला संरक्षणासाठी जे प्रशिक्षण दिले गेले आहे, त्याच्या अगदी विपरीत काम आम्हाला करावे लागत आहे. यामुळे आशीष यांच्या संरक्षणाची जबाबदारी योग्य रित्या पार पाडता येत नाही. ही व्यवस्था बदलली पाहिजे. बुधवारी तिवारी यांनी बाइक चालवण्यास नकार दिला, त्यानंतर आशीष यांनी त्यांना स्वतःच्या सायकलवर बसवून प्रवास सुरु केला.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कोण आहे आशीष चतुर्वेदी