आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापमं घोटाळा: एसटीएफ सोपवणार दहा टन कागदपत्रे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर व्यापमं घोटाळ्यातील एकूण ५५ प्रकरणांचा तपास सोमवारी एसटीएफकडून सीबीआयकडे सोपवला जाऊ शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अडीच ट्रक म्हणजे जवळपास दहा टन कागदपत्रे सीबीआयला सोपवायची आहेत. ही कागदपत्रे पुढील तपासासाठी त्यांना उपयुक्त ठरू शकतात. यात आतापर्यंत सादर करण्यात आलेली पुरवणी आरोपपत्रे, केस डायरी तसेच तपासाशी संबंधित इतर महत्त्वपूर्ण कागदपत्रांचा समावेश आहे. या प्रकरणांत एसटीएफने आतापर्यंत १२०० लोकांविरोधात खटला दाखल केला आहे.

सीबीआयला जी कागदपत्रे सोपवली जाणार आहेत, त्यात सर्वाधिक महत्वपूर्ण अशा पीएमटी -२०१३ व पीएमटी -२०१२ ची केस डायरीचा समावेश आहे. केवळ पीएमटी -२०१३ चा विचार केला तर ६ जुलै २०१३ पर्यंत दाखल करण्यात आलेल्या या प्रकरणाची केस डायरीच सुमारे १ लाख पानांची आहे. चारशेपेक्षा जास्त आरोपींचे जाबब व दररोज त्यात जोडल्या जाणाऱ्या पानांमुळे ही डायरी इतकी माेठी झाली आहे. असाच प्रकार पीएमटी - २०१२च्या केस डायरीचा आहे. कारण यातही आतापर्यंत ३०० वर लोकांना आरोपी बनवण्यात आले आहे. आतापर्यंत यात ५० पेक्षा जास्त तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एसटीएफ स्वत:जवळ या प्रकरणाच्या तक्रारीदेखील ठेवू इच्छित नाही. एसटीएफकडे व्यापमं परीक्षेत झालेलया घोटाळ्यांबाबत जवळपास ५० तक्रारी आलया आहेत.

एसटीएफ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणात आतापर्यंत एकही प्रकरण दाखल झालेले नाही. तरीही सर्व तक्रारी सीबीआयकडे सुपूर्द केल्या जातील. तपासात झालेल्या प्रगतीचा अहवालही सीबीआयला सोपवला जाणार आहे.

प्रत्येक केस तपासणार
व्यापमंशी संबंधित सर्व प्रकरणांचा अभ्यास एकाच वेळी करणे कोणत्याच तपास यंत्रणेला शक्य नाही. सीबीआयचे पथक एक - एक प्रकरण हाती घेऊन त्याचा अभ्यास करेल. एसटीएफच्या तपास अधिकाऱ्यांना पुढचे काही िदवस सीबीआयसोबत राहावे लागू शकते. तसेच एसटीएफकडून सीबीआयला ५५ प्रकरणे हस्तांतरित करण्याला एक महिन्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो.
बातम्या आणखी आहेत...