आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोलमजुरी करणार्‍या मजुराच्या बॅंक खात्यावर जमा झाले 99 अब्ज रुपये, बॅंकेने सीझ केले अकाउंट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उज्जैन/इंदूर- मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये मोलमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार्‍या एका मजुराच्या बॅंक खात्यावर 99 अब्ज रुपये जमा झाल्याने खळबळ उडाली आहे. बॅंकेने तात्कळ या व्यक्तिचे अकाउंट सीझ केले आहे. अंबाराम असे या व्यक्तिचे नाव आहे.

अंबाराम यांना मुलीच्या कॉलेजची फी भरायची होती. त्यासाठी ते बँकेत रुपये काढण्यासाठी गले असता त्याच्या अकाउंंट अकाउंटमध्ये 99 अब्ज रुपये डेबिट झाल्याचेे बॅंक अधिकार्‍याच्या लक्षात आले.

वाचा... काय आहे हे प्रकरण...?
- दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी अंबाराम याने त्याच्या अकाउंटमध्ये 50 हजार रुपये डिपॉझिट केले होते. नंतर ते विथड्रालही केले होते.
- पण, तेव्हा बॅंक अधिकार्‍याने ही बाब गांभिर्याने घेतली नव्हती.

बॅंक अधिकारी काय म्हणाले अंबारामच्या अकाउंटबाबत...
- नागझिरी शाखेचे व्यवस्थापक निशा परमार यांनी सांगितले की, सिस्टिममधील तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडला आहे.
- जिल्हा अंत्यावसायी विभागाद्वारे अंबारामच्या अकाउंटमध्ये एवढी मोठी रक्कम जमा झाल्याचे दिसत आहे. अंबारामच्या अकाउंटमधे केवळ 1130 रुपये शिल्लक होते.

पुढील स्लाइडवर वाचा, काय आहे हे प्रकरण...?
बातम्या आणखी आहेत...